व्हॉईस ऑफ मीडियाचे कार्य कौतुकास्पद! : पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे. ; VOM सिंधुदुर्ग टीमने घेतली सदिच्छा भेट, आगामी उपक्रमांबद्दल केली चर्चा.

दोडामार्ग : पत्रकार बांधवांसाठी सातत्याने आवाज उठविणाऱ्या आणि अनेक देशांत विधायक कार्य करणाऱ्या व्हॉईस ऑफ मीडिया या संघटनेचे कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार दोडामार्ग पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी काढले.

व्हॉईस ऑफ मीडिया संघटना, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्या टीमने आज दोडामार्ग पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांची सदिच्छा भेट घेऊन व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेच्या वतीने आजपर्यंत राबविण्यात आलेल्या उपक्रमांची तसेच टीम सिंधुदुर्गच्या वतीने आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाबाबत माहिती दिली व सकारात्मक चर्चा केली. तसेच आगामी काळात विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याचे निमंत्रणही त्यांना दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रा. रूपेश पाटील, कार्याध्यक्ष भूषण सावंत, उपाध्यक्ष मिलिंद धुरी, खजिनदार आनंद कांडरकर, सदस्य साबाजी परब यांसह अन्य उपस्थित होते.

दरम्यान, व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेच्या वतीने आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमास आपले नेहमीच सहकार्य राहील, असे आश्वासन देखील पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी यावेळी दिले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles