Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

दयानंद कुबल यांची महाराष्ट्रातील खासगी वसतिगृह संघटनेच्या कार्याध्यक्षपदी एकमताने निवड! ; संघटनेच्या अध्यक्षपदी महेश निंबाळकर, तर सचिवपदी महेश यादव यांची नियुक्ती!

संघटनेच्या अध्यक्षपदी महेश निंबाळकर, तर समहेश यादव यांची नियुक्ती!

बालकांच्या वसतिगृह संस्थांचा पुढाकार — राज्यभरातील सामाजिक संस्थांची एकजूट.

मुंबई : महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू मुलांसाठी खाजगी सामाजिक संस्थांच्या माध्यमातून वसतिगृहे चालवली जातात. शिक्षण, संगोपन आणि संस्कार देणाऱ्या या संस्थांनी गेल्या काही वर्षांमध्ये हजारो मुलांचे जीवन बदलले आहे. मात्र, अलीकडील काही अपवादात्मक घटनांमुळे संपूर्ण वसतिगृह क्षेत्रच संशयाच्या छायेत सापडले आहे. परिणामी, प्रामाणिकपणे कार्यरत संस्थांनाही नोटिसा, चौकशी आणि कारवाईचा सामना करावा लागत आहे.या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी राज्यातील सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन ‘खाजगी वसतिगृह संघटना’ स्थापन केली आहे. . या संघटनेच्या अध्यक्षपदी महेश निंबाळकर (पुणे) तर कार्याध्यक्षपदी दयानंद कुबल (मुंबई) यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.

नव्या कार्यकारिणीत पुढील पदाधिकाऱ्यांचा समावेश:
उपाध्यक्ष – ॲड. सुजाता अंगडी, जीवन संवर्धन फाउंडेशन, ठाणे

सचिव – महेश यादव, स्पर्श शेल्टर होम, पुणे

सहसचिव – अक्षदा भोसले, अंकुर सामाजिक संस्था, डोंबिवली

कोषाध्यक्ष – विश्वास लोंढे, शाश्वत उत्क्रांती प्रतिष्ठान, ठाणे

सदस्य –

तेजस कोठावळे (आनंदग्राम गुरुकुल, पुणे)

ॲड. राजीव करडे (श्रावण बाळ आश्रम, पुणे)

प्रसाद मोहिते (प्रार्थना फाऊंडेशन, सोलापूर)

दत्ता इंगळे (जीवनविद्या परिवर्तन ट्रस्ट, पुणे)

शरद आढाव (जनजागृती प्रतिष्ठान, अहिल्यानगर)

मधुकर सोनवणे (खुशीग्राम फाऊंडेशन, लातूर)

सुधीर भोसले (पारधी समाज जनजागृती सेवाभावी संस्था, बीड)

ठोस नियमावलीची मागणी
महाराष्ट्रातील खाजगी वसतिगृहांसाठी स्पष्ट, ठोस आणि बंधनकारक नियमावलीची मागणी ही संघटना करत आहे. २०१५ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने राज्य शासनाला अशी नियमावली तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार २ नोव्हेंबर २०१५ रोजी शासन निर्णय जारी झाला, परंतु अनेक बाबी अद्याप अस्पष्ट आहेत. परिणामी, पालकांच्या संमतीने मुलांना प्रवेश देणाऱ्या वसतिगृहांवरही कारवाई होत आहे.ही संघटना शासकीय निकषांचे पालन करणाऱ्या संस्थांना संरक्षण देण्यासाठी, पारदर्शक कार्यपद्धती राबवण्यासाठी आणि बालकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी कार्यरत राहणार आहे.

———————————
चौकट:

खाजगी संस्था वसतिगृह संघटना सरकारदरबारी एक संयुक्त, जबाबदार आणि कायदेशीर आवाज बनून उभे राहणार आहे. पारदर्शक कार्यपद्धती, बालकांच्या हक्कांचे रक्षण, आणि प्रामाणिक संस्था टिकवण्यासाठी सामूहिक पाठपुरावा हे संघटनेचे प्राथमिक उद्दिष्ट राहील.

महेश निंबाळकर- अध्यक्ष- खाजगी संस्था वसतिगृह संघटना
———————
खऱ्या अर्थाने बालकांच्या संरक्षणासाठी आणि प्रामाणिक संस्थांच्या हक्कांसाठी ही संघटना लढा देणार आहे. वसतिगृह क्षेत्रात पारदर्शकता, सुसूत्रता आणि विश्वास निर्माण करण्यासाठी राज्यस्तरावर ही संघटना महत्त्वाची भूमिका बजावेल.

दयानंद कुबल, कार्याध्यक्ष- खाजगी संस्था वसतिगृह संघटना

महाराष्ट्रातील शकेडो खाजगी वसतिगृहे चालवणाऱ्या संस्थांच्या सामूहिक प्रयत्नातून या संघटनेची निर्मिती झाली असून काल झालेल्या बैठकीत राज्यस्तरीय पदाधिकारांच्या नावांची घोषणा पुणे येथे करण्यात आली.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles