वैभववाडी : ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे २०२५ चे राज्यस्तरीय अधिवेशन दि.१९ व २० जुलै रोजी धाराशिव येथे आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाच्या तयारीसाठी धाराशिव येथे राज्य अध्यक्ष डॉ.विजय लाड यांच्या अध्यक्षतेखाली तयारी आढावा बैठक पार पडली. धाराशिव येथील बीड-सोलापूर बायपास मार्गावर असलेल्या गणेश मंगल कार्यालयात ही बैठक संपन्न झाली.
या बैठकीत आगामी अधिवेशनाच्या नियोजनासह व्यवस्थेसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी राज्य सचिव अरुण वाघमारे यांनी अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेतला.
यावेळी राज्य संघटक सर्जेराव जाधव, राज्यसहसंघटक मेधाताई कुलकर्णी, मराठवाडा विभाग संघटक हेमंत वडने, जिल्हाध्यक्ष अजित बागडे, लातूर जिल्हाध्यक्ष प्रल्हाद तिवारी, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कांबळे, जिल्हा सचिव आशिष बाबर, संघटक रवी पिसे, सहसंघटक विशाल शिंदे, शरद वडगावकर यांच्यासह राज्याचे व जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित होते.
या अधिवेशनात शासकीय अधिकारी, विविध विषय तज्ञ मंडळी विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. या अधिवेशनात विभागनिहाय दिला जाणारा शेतकरी, उद्योजक व्यापारी, श्रमिक व ग्राहक हा पंचप्राण पुरस्कार व उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे. तरी राज्यातील जास्तीत जास्त सदस्य व कार्यकर्त्यांनी लवकरात लवकर
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfcV1TGhK5X8S84AviCzF1nsDAYWYBntowF4P0L5cchH66tgQ/viewform?usp=header
या लिंकवरुन आँनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन संस्थेचे राज्य अध्यक्ष डॉ.विजय लाड,संघटक सर्जेराव जाधव व सचिव श्री.अरुण वाघमारे यांनी केले आहे.
ग्राहक पंचायतच्या राज्य अधिवेशनास कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे ! : राज्याध्यक्ष डॉ. विजय लाड. ; १९, २० जुलै रोजी धाराशिव येथे होणार अधिवेशन.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


