सरपंच मानधनातून घरपट्टी माफ! ; सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठरल्या पहिल्या सरपंच.
दोडामार्ग : सरगवे, आयनोडे ग्रामपंचायत क्षेत्रात आपल्या पाल्यांना जिल्हा परिषद मराठी शाळेत प्रवेश घ्या व आपली एका वर्षाची घरपट्टी स्वतःच्या मिळणाऱ्या सरपंच मानधनातून भरणार, असा क्रांतिकारक निर्णय झरे-२ ग्रामपंचायतच्या सरपंच सौ. श्रृती विठ्ठल देसाई ह्या आपल्या उर्वरित सरपंच कालावधीत दरवर्षी मराठी शाळेत नवीन प्रवेश घेणा-या विद्यार्थीच्या कुटुंबियांची घरपट्टी माफ करणार आहेत. त्यांनी घेतलेल्यायांनी घेतला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच हा धाडसी निर्णय मराठी शाळेत प्रवेश घ्या व एक वर्षाची घरपट्टी माफ असा क्रांतिकारक निर्णय प्रथमच दोडामार्ग तालुक्याच्या 26 व्या वर्धापनदिनी झरे-२ ग्रामपंचायत सरपंच सौ.श्रुती देसाई यांनी घेतला असून या निर्णयाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात असा निर्धार करणा-या सौ.श्रृती विठ्ठल देसाई ह्या पहिल्या सरपंच ठरल्या आहेत.
सद्यस्थितीत अनेक पाल्यांचा आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत पाठवावे असे निर्णय होत असतात. त्यासाठी मराठी माध्यमातील शाळातील विद्यार्थ्यांची संख्या कमी होऊ नये यासाठी झरे-२ सरपंच सौ.श्रृती देसाई यांनी हा निर्णय घेतला असून मराठी शाळेतील पटसंख्या वाढवावी या हेतूने त्यांनी स्वतःच्या मिळणाऱ्या सरपंच मानधनातून सदर पाल्याचा प्रवेश हा मराठी शाळेत घेतला तर एका वर्षाची घरपट्टी माफ केली जाणार आहे असा क्रांतीकारक निर्णय त्यांनी घेतला असून त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.


