सावंतवाडी : राजेंद्र बाळासो सनगर ( वय 45 वर्षे, पंचायत समिती शिक्षण विभाग, राह. चिले कॉलनी कोल्हापूर) हे कोल्हापूर जिल्हा परिषद मधील 9 कर्मचारी व इतर 11 असे एकूण 19 जणांची टीम 4 वाहनातून रेडी येथे जात असताना आज कावळेसाद पॉईंट येथे आज सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास फोटो काढताना रेलिंगजवळून पाय घसरून खाली दरीत पडले आहेत. अधिकारी, अंमलदार व बचाव पथकाचे लोकं त्यांचा शोध घेत आहेत. मात्र दाट धुके असल्याने शोध कार्यात अडचण येत असल्याने उद्या सकाळी पुढील कार्यवाही करीत असल्याचे सावंतवाडी पोलिसांनी कळविले आहे.



