सावंतवाडी : सध्याचे युग हे ‘एआय’चे युग आहे. या युगात विविध क्षेत्रे खुली आहेत. तेवढेच या युगात स्पर्धाही वेगाने पुढे जात आहे. या स्पर्धेत टिकायचं असेल तर आपल्या आवडीचे क्षेत्र निवडून त्यात यशस्वी व्हा!, असे आवाहन तथागत नागरिक पतसंस्थेचे अध्यक्ष तथा सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी अरविंद वळंजू यांनी केले. सेवानिवृत्त बौद्ध अधिकारी – कर्मचारी संस्था, सिंधुदुर्गतर्फे बौद्ध समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव ओरोस येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृहात आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत कदम होते.

कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजन व सामुदायिक बुद्ध वंदनेने करण्यात आली. त्यानंतर आनंद धामापूरकर यांनी उद्देशिकेचे सामुदायिक वाचन केले. त्यानंतर सेवानिवृत्त उच्चश्रेणी मुख्याध्यापिका ममता जाधव यांनी बुद्ध गीताने स्वागत केले. तर मोहन जाधव यांनी प्रास्ताविक केले. यावेळी वळंजू यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सर्व क्षेत्रे चांगले आहेत. मात्र आपली आवड आपली क्षमता आणि आर्थिक बाजू याचे भान ठेवून करिअर निवडावे असे आवाहन त्यांनी केले.

अध्यक्षपदावर बोलताना सूर्यकांत कदम यांनी आमची ही संस्था सेवानिवृत्त झालेल्यांची जरी असली तरी संस्थेचे काम हे व्यापक असून तळागाळात पोचून सामान्यांचा विकास करणे हेच उद्दिष्ट आहे संस्थेने गेल्या पाच सहा वर्षात विविध सेवाभावी उपक्रम राबवून समाजात हे आपले स्थान निर्माण केले आहे त्याचाच एक भाग म्हणून म्हणजे तथागत नागरिक पतसंस्था ही निर्माण करून समाजात एक आर्थिक स्रोत निर्माण करण्याचे काम करण्यात आले आहे .या पतसंस्थेचे पत वाढवण्याचे काम समाजाने करावे असे आवाहनही त्यांनी केले .यावेळी संस्थेचे रमेश कदम ,रूपाली पेंडुरकर ,पालक संजय पाटील ,प्रा . धार पवार विद्यार्थिनी आर्या किशोर कदम ,साक्षी कदम, आर्या जाधव आदींनी मनोगत व्यक्त करून सत्काराबाबत कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रद्धा कदम व ममता जाधव यांनी केले. आभार प्रदर्शन आनंद धमापुरकर यांनी केले. यावेळी जिल्ह्यातील संस्थेचे पदाधिकारी गुणवंत विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


