Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

‘आग्रा ते राजगड’ शिवज्योतीचे धुळ्यात दमदार आगमन, नगाव येथे विद्यार्थी, शिक्षकांनी केले जल्लोषी स्वागत. ; पुढील वर्षी जोरदार विस्तारीत स्वरुपात साजरा करू शिवज्योतचे स्वागत – शिवभक्त भूपेश पाटील यांचा संकल्प.

नगाव (धुळे) : दरवर्षीप्रमाणे आग्र्याहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून सुरू झालेल्या गरुडझेप मोहीम शिवज्योतीचे नुकतेच धुळे येथे आगमन झाले. गरुड झेपचे धुळ्याचे शिवप्रेमी भूपेश पाटील, मुख्याध्यापिका रेखा कदम यांचे हाती वारूळ (ता. शिंदखेडा) येथून शिवज्योत सोपविण्यात आली.

दरम्यान नगाव येथे स्व. अण्णासाहेब द. वा. पाटील विद्यालयाचे प्राचार्य आर. आर. पाटील, ज्येष्ठ शिक्षक जे. आर. पाटील, पंजाबराव पाटील, भूषण पाटील, जगदीश पाटील, राहुल पाटील यांसह विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षिका तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. आर. एच. पाटील, प्रा. राकेश पाटील, प्रा. योगेश पाटील, प्रा. सुशांत पाटील, तमाम शिक्षकेतर कर्मचारी, असंख्य विद्यार्थी,  लहान थोर नागरिक, नगाव ग्रामपंचायत सदस्य पै. दीपक खैरनार, अशोक (बाळू) पाटील, संभाजी पवार, नगाव गावातील प्रतिष्ठीत सामाजिक कार्यकर्ते पै. बन्सिलाल पाटील, तसेच भूपेश पाटील यांचे ज्येष्ठ मामाश्री व सेवानिवृत्त वरिष्ठ लिपीक के. एम. पाटील आदी सर्व शिवभक्तांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून शिवज्योतीचे भव्य स्वागत केले.

 

तसेच श्री. नागसेन विद्यालय वाडीभोकर यांचे विद्यार्थी, धुळे योग विद्यालयाचे योग साधक तसेच कुवर नगर मधील माजी सैनिक आणि शिवभक्त मावळे यांनी ही शिवज्योत घेत वारूळ ते केशरानंद गार्डन धुळे हे 34.7 किलोमीटर अंतर धावत तीन तासात पार करत धुळ्यात प्रवेश केला, याप्रसंगी ढोल ताशांच्या गजरात असंख्य शिवभक्तांनी शिवज्योतीचे स्वागत केले.

वारूळ ते धुळे या प्रवासादरम्यान जागोजागी शिवज्योतीचे आणि त्यासोबत धावणाऱ्या असंख्य मावळ्यांचे शिवभक्तांचे भव्य स्वागत करण्यात आले. देवभाने येथील हॉटेल कृष्णचे माळी दादा आणि महेश देसले यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या श्रद्धेने शिवज्योतीचे पूजन आरती करून समस्त मावळ्यांना चहापान देत स्वागत केले.
त्याप्रसंगी शिवज्योतीचे पूजन आणि भूपेश पाटील, संजय कदम सर यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार देवून सत्कार करण्यात आला, विद्यार्थ्यांनी दिलेल्या शिवघोषाने आसमंत दुमदुमला.

श्री केशरानंद गार्डन येथे शिवज्योतीचे स्वागत झाल्यावर गरुड झेप मोहिमेचे संस्थापक आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायदळाचे प्रमुख सरनौबत नरवीर पिलाजीराव गोळे यांचे चौदावे वंशज, सर्वाधिक किल्ले सर करण्याचा जागतिक किर्तीमन असलेले एडवोकेट आबासाहेब मारुती गोळे आणि गरुड झेप मोहिमेचे अध्यक्ष राकेश भाऊ विधाते यांच्यासह समस्त मावळ्यांचं आणि शिवभक्तांचे स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली..धुळे जिल्हा जिजाऊ ब्रिगेडच्या सौ अर्चना खैरनार मॅडम, पाटील मॅडम यांनी आदरणीय आबासाहेब गोळे यांचे सुंदर गुलाबाचे रोप देऊन स्वागत सत्कार केला. नाशिककर ज्वेलर्सचे संचालक अजय नाशिककर यांनी मशाल घेऊन धावणाऱ्या सर्व मावळ्यांचे फुलहार देऊन स्वागत केले.
गरुड झेप मोहिमेचे उद्देश्य त्यामागचा विचार , गेल्या पाच वर्षापासून सुरू केलेली गरुड झेप मोहीम याची ओळख इतंभुत माहिती आणि आबासाहेब मारुती गोळे यांचा परिचय श्री भूपेश पाटील यांनी जमलेल्या शिवभक्तांना करून दिला.

याप्रसंगी धुळ्यात प्रथमच शिवकालीन युद्ध कलेचे शस्त्रास्त्र प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.

एका तरुणीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा गाऊन जोशपूर्ण वातावरण तयार केले त्यावर श्री भूपेश पाटील यांनी केलेली शिवगर्जना गारद प्रत्येक शिवभक्तांना रोमांचित करून गेली.


छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार, विचार,पराक्रम आणि चारित्र्य जनसामान्यात पोहोचावं, नवीन पिढीला यातून प्रेरणा मिळावी त्या गौरवशाली इतिहासाला उजाळा मिळावा हाच या मोहिमेचा उद्देश आहे असे प्रतिपादन आबासाहेब मारुती गोळे आणि भूपेश पाटील यांनी केले.

या कार्यक्रमाला यशस्वी करण्यात हिंदू एकताचे मनोज भाऊ घोडके , मनोज भाऊ मोरे, आणि सौ रेखा कदम मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले. केशरानंद गार्डनचे मालक संचालक आणि कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य प्राप्त करून दिले. जमलेल्या सर्व मावळ्यांना उत्तम प्रकारचा नाष्टा चहा पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.
संपूर्ण नियोजन जबाबदारी श्री भूपेश पाटील आणि प्रितेश ठाकूर यांनी बजावली.

त्यानंतर मुसळधार पावसाने लावलेल्या हजेरीत पुढील वर्षी शिवकालीन युद्ध कलेचे प्रात्यक्षिक मोठ्या प्रमाणावर सादर करण्याचा संकल्प मांडून आणि आपल्या माता भगिनींना संरक्षण प्रशिक्षण देण्याचा विचार करून शिवज्योत राजगडाकडे मार्गस्थ झाली.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles