सावंतवाडी : पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज पुण्यतिथी निमित्त अखिल भारतीय मराठा महासंघ व सावंतवाडी संस्थान मराठा समाज, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत खुल्या गटात रिया भिकाजी मेस्त्री व लहान गटात यश प्रवीण सावंत यांचा प्रथम क्रमांक आला. विजेत्यांना रोख बक्षीस, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले तसेच सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.
पुण्यश्लोक पंचम खेमसावंत उर्फ बापूसाहेब महाराजांचा जीवनपट व कार्य व इतिहास सर्वसामान्यापर्यंत पोहचावे यासाठी त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत लहान गटात प्रथम क्रमांक यश प्रवीण सावंत, द्वितीय क्रमांक हंसिका जगन्नाथ वजराटकर, तृतीय क्रमांक निधी सचिन सोनवडेकर यांचा आला तर खुल्या गटात प्रथम क्रमांक दिया भिकाजी मेस्त्री, द्वितीय क्रमांक प्राजक्ता परशुराम मोरजकर, तृतीय क्रमांक युक्ता प्रसाद सापळे यांचा आला.
या स्पर्धेच्या उदघाट्न व बक्षीस वितरण कार्यक्रमाला अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्ग चे जिल्हाध्यक्ष ऍड सुहास सावंत, सावंतवाडी संस्थान मराठा समाज सावंतवाडी चे समिती प्रमुख रामचंद्र परब, समिती समन्वयक नंदू गावडे, भगिनी मंडळ सदस्य व माजी अध्यक्षा अदिती सावंत, स्वाती सावंत, काजरेकर मॅडम, अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्ग चे सोशल मिडिया जिल्हाध्यक्ष विनय गायकवाड, दुर्गसंशोधन व इतिहास संशोधन विंग जिल्हाध्यक्ष गणेश नाईक, शैलेश घोगळे, योगेश काळप उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षक म्हणून इंदू डगरे व गणेश नाईक यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनय गायकवाड यांनी तर आभार गणेश नाईक यांनी मानले.
जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत दिया मेस्त्री, यश सावंत प्रथम ! ; पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज पुण्यतिथीनिमित्त अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्गच्या वतीने आयोजन.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


