सावंतवाडी : ‘माझा युवा भारत सिंधुदुर्ग’ आणि ‘पब्लिक रिलेशन फाऊंडेशन, सिंधुदुर्ग’ यांच्या माध्यमातून नित्यनिकेतन सेवा केंद्र सावंतवाडी येथे “एक पेड माँ के नाम” हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ह्यावेळी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती सन्माननीय समीर नाईक NYK जाधव, जयराम जाधव त्याचबरोबर पब्लिक रिलेशन फाऊंडेशनच्या संस्थापक सौ. फिजा मकनदार व नित्यनिकेतन सेवा केंद्राच्या सिस्टर हेल्मा उपस्थित होत्या. ह्या कार्यक्रमाला शुभेच्छा देताना माननीय समीर नाईक व जाधव असे म्हणाले की आज वाढते जागतिक तापमान (global warming) आले आहे आणि सगळा गोष्टींमुळे धोक्यात आलेला मानवी जीवन त्यामुळे आपल्या पर्यावरणाची काळजी घेणे अत्यंत गरजेचं आहे. ह्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पब्लिक रिलेशन फाउंडेशनच्या संस्थापिका सौ. फिजा मकनदार यांनी केले असे म्हणाल्या की आज पर्यावरणाची काळजी घेणे इतके नदी डोंगर, झाडे, पशु प्राणी ह्यांची काळजी घेणे म्हणजे फक्त आपले कर्तव्य नाही तर आपली जबाबदारी पण आहे. त्यांनी पर्यावरणाची आपण कशी काळजी घेतली पाहिजे ह्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज ह्यांनी पर्यावरण धोरण कसे होत हे नेहमी शब्दात सांगितले.
कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन साधी कांबळेकर हिला देऊन तर कार्यक्रमाचे आभार साधी भाविका कदम यांनी मानले. ह्या विशेष कार्यक्रमाला रिल स्टार रोहित जाधव उपस्थित होते. त्यांनी असे सांगितले की आज सोशल मीडियाचा ताकद खूप मोठी आहे त्यामुळे निसर्ग आणि पर्यावरण ह्या सगळ्यांची जनजागृती आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील केली पाहिजे. त्याचबरोबर ह्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने साथी नासिर मकनदार, साथी राकेश जाधव, साथी फातिमा मकनदार, वहिनी मकनदार, साथी श्रुती सावंत, साथी श्रद्धा परब त्याच सोबत नित्य निकेतन सेवा केंद्राच्या अवधोणी ब्रेगेन्झा, सिम्रन लोबो, रोजना बोर्डेकर, भक्ती मेस्त्री, सानिया फर्नांडिस, कनिष्ठ सम्राट, योगिता पाटील, प्रियांका जोसेफ, उज्वला लांबोर, अलेरिपा लोबो, बबिता वरद, पावलिन डिसोझा इत्यादी सगळे उपस्थित होते.


