वेंगुर्ला : गुरुपौर्णिमेच्या पवित्र पर्वावर, भाजपा वेंगुर्लाच्या वतीने दोन आदरणीय गुरुजनांचा त्यांच्या निवासस्थानी जाऊन सत्कार करण्यात आला. समाजात ज्ञानाचा प्रकाश पसरवणाऱ्या आणि निष्ठापूर्वक कार्य करणाऱ्या या दिग्गजांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा क्षण होता.
यामध्ये श्री. अनंत आठले गुरुजी यांचा सत्कार करण्यात आला. आठले गुरुजी हे भाजपाचे जुने आणि निष्ठावान कार्यकर्ते आहेत, तसेच ते सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक आणि संघाचे स्वयंसेवक म्हणूनही परिचित आहेत. त्यांची संपूर्ण हयात त्यांनी समाजसेवेत आणि राष्ट्रनिर्माणासाठी वाहिली आहे. नव्या पिढीतील कार्यकर्त्यांसाठी ते नेहमीच एक प्रेरणास्थान राहिले आहेत.

तसेच, डॉ. वामन कशाळीकर यांचाही सत्कार करण्यात आला. डॉ. कशाळीकर हे जुने आणि प्रतिष्ठित MBBS डॉक्टर असून, त्यांनी आरोग्य सेवेत मोलाचे योगदान दिले आहे. विशेष म्हणजे, त्यांना भगवद्गीतेच्या पाठांतरासाठी करवीर पीठाच्या शंकराचार्यांकडून सन्मानित करण्यात आले आहे. त्यांची ही साधना आणि ज्ञाननिष्ठा खरोखरच कौतुकास्पद आहे.
भाजपा वेंगुर्लाच्या वतीने या दोन्ही महान गुरुजनांचा गौरव करताना आम्हाला अभिमान वाटतो. त्यांच्या कार्याला आणि योगदानाला शतशः नमन!
यनिमित्त माजी तालुकाध्यक्ष श्री. सुहास गवंडळकर, जिल्हा उपाध्यक्ष सौ. सुषमा प्रभुखानोलकर, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सौ. वृंदा गवंडळकर, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष सौ. सुजाता पडवळ, जिल्हा कार्यकारणी सदस्य श्री. वसंत तांडेल, जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष श्री. हेमंत गावडे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रणव वायंगणकर, माजी नगरसेविका सौ. साक्षी पेडणेकर, बूथ अध्यक्ष श्री रवी शिरसाठ, बूथ अध्यक्ष श्री. पुंडलिक हळदणकर, तालुका महिला मोर्चा सरचिटणीस सौ. आकांशा परब, महिला मोर्चा चिटणीस सौ. प्रार्थना हळदणकर, रसिका मठकर इ. भाजपा कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.


