धुळे : 48 महाराष्ट्र बटालियन एनसीसी धुळेमार्फत जिल्हा क्रीडा संकुल येथे 48 महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल शैलेंद्र कुमार गुप्ता व प्रशासकीय अधिकारी कर्नल सुदीप मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 8 जुलै 2025 ते17 जुळे2025 या कालावधी अंतर्गत संयुक्त वार्षिक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 10 जुलै 2025 रोजी जव्हार फाउंडेशन एसीपीएम मेडिकल व डेंटल कॉलेज धुळे यांचे मार्फत वैद्यकीय तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. एनसीसी शिबिरातील 450 विद्यार्थ्यांचे दंत तपासणी करण्यात आली. त्याच प्रमाणे दंत स्वच्छता , काळजी या बद्दल माहिती डॉक्टर. दिव्या घुणे यांनी सांगितले की किशोर वयात मुलांचे दात वेडेवाकडे असतात यावर योग्य उपचाराची गरज असते वेळेत उपचार न झाल्यास अधिक समस्या वाढू शकतात आणि एका दाताना कीड लागल्यास सर्व दात बाधित होऊ शकतात दात चांगले असल्यास अन्नाचे चर्वण चांगले होऊ शकते आणि पचन क्रियाही सुधारते या कारणास्तव सर्वांनी दाताचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करावा, असे मार्गदर्शन करण्यात आले.
डॉ. पूजा कुंभारगावे, डॉ. सोनिया अहिरे, डॉ. मयुरी सोनवणे यांनी वैद्यकीय तपासणी पूर्ण केली.

दिनांक 10 जुलै रोजी विद्यार्थी यांना मॅप सेटिंग,.22 रायफल की जानकारी, ऑर्गनायझेशन ऑफ एनसीसी अँड रँक यावर माहिती देण्यात आली.तसेच कॅप्टन डॉ.सुनील पाटील यांनी पर्यावरण संरक्षण या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी
कॅप्टन डॉ .सुनील पाटील , लेफ्टनंट डॉ .राजेश चंदनशिव , सुभेदार मेजर तिलकराज, फर्स्ट ऑफिसर स्मित वाघ, सेकंड ऑफिसर राहुलसिंग राजपूत, फर्स्ट ऑफिसर बोरसे ,ट्रेनिंग जेसीओ करमजीत सिंग, बी एच एम दीपक पाटील, हेड क्लर्क प्रदीप शिंदे, ट्रेनिंग क्लर्क संपदा कुलकर्णी , सीटीओ आश्विनी देशमुख , राकेश पावरा परिश्रम घेत आहेत.


