सावंतवाडी : तालुक्यातील तळवडे येथे नुकताच दहावी, बारावी आणि शिष्यवृत्ती परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. प्रकाश परब संपर्क कार्यालय येथे आयोजित या कार्यक्रमात सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत गुणवंत विद्यार्थी आणि शिष्यवृत्तीधारकांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी स्व. प्रकाश परब फाऊंडेशनचे अध्यक्ष महेश पटव, सूरज प्रकाश परब, शिवसेना शाखाप्रमुख जालिंदर परब, महिला शाखाप्रमुख जयमामा गावडे, रोहित परब, बतात्या यख, बाळा सामंत, रघुनाथ रेडकर, पुरुषोत्तम सावंत, बबन जाधव, विनोद वराडकर यांच्यासह इतर शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सत्कार सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांच्या यशाला प्रोत्साहन मिळाले असून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या


