आजगाव : आजगाव, भोमवाडी व धाकोरे या तीन गावांसाठी आरोग्य सेवा देणार्या आजगाव आरोग्य उपकेंद्रास आजगाव ग्रामपंचायतच्या वतीने विविध औषधे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. 15व्या वित्त आयोग निधीमधून दहा हजार ब्लड प्रेशरवरील गोळ्या, पाच हजार कॅल्शियम, Vitamin – D, पाच हजार हिमोग्लोबिनसाठी गोळ्या, 2 Cough Syrup Can आणि काही काही मलम ट्यूब अशी औषधे देण्यात आली.

यावेळी आजगाव सरपंच यशश्री सौदागर, उपसरपंच सुशील कामटेकर, ग्रामपंचायत सदस्य बाळू पांढरे, राकेश सावंत, सौ. सेजल रेडकर, सौ वर्षा रेवाडकर, सौ. वैष्णवी आजगावकर, ग्रामसेवक संदीप गवस यांच्या हस्ते आजगाव उपकेंद्र आरोग्य अधिकारी डॉ. सायली मॅडम, आरोग्य सेविका सिस्टर कानसे, आरोग्य सेवक प्रसाद जोशी, आशा सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.



