Sunday, November 9, 2025

Buy now

spot_img

राणीसाहेब शुभदादेवी भोंसले यांच्या मातोश्री श्रीमती मृणालिनीदेवी सावंत यांना SPK महाविद्यालयात श्रद्धांजली!

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीच्या कार्याध्यक्षा राणीसाहेब सौ. शुभदादेवी खेमसावंत भोंसले यांच्या मातोश्री श्रीमती मृणालीनीदेवी शिवाजीराव सावंत यांचे दिनांक 23 जुर्ले 2025 रोजी वयाच्या 89 व्या वर्षी बेंगलोर येथे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांना महाविद्यालयाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारी सदस्य श्री जयप्रकाश सावंत, डॉ. सतीश सावंत, संस्थेचे संचालक प्रा. डी. टी. देसाई, सहसंचालक अॅड. शामराव सावंत, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. यु एल देठे, महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग ,शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेच संचालक प्रा. डी टी देसाई यांनी यावेळी
सांगीतले की माॅं साहेब या अतिशय दिलदार ,मनमिळाऊ होत्या ,सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विषयी त्यांना आपुलकी होती . सहसंचालक अॅड.शामराव सावंत यांनी सांगितले की सर्वांना काहीतरी भेटवस्तु द्यायला हवी असे त्यांना नेहमी वाटायचे ,त्या उत्तम स्वयंपाक करायचा, केक बनवण्यात त्यांचा हातखंडा होता ,प्रत्येक वर्षी सावंतवाडी राजवाडा येथे येऊन ख्रिसमस मध्ये त्या अनेक खाद्यपदार्थ बनवून सर्वाना खाऊ घालायच्या ,
प्रत्येकासाठी भेटवस्तु सुद्धा बेंगलोर वरून घेऊन यायच्या. सर्वसामान्याप्रती त्यांना आपुलकी होती. त्या दिलदारपणे सर्वांना मदत करायच्या .अर्थशास्त्र विभागाचे प्रा.टी व्ही कांबळे यांनी श्रद्धांजली वाहताना सांगितले माॅंसाहेब या आमच्याशी नेहमी आपुलकीने वागायच्या . संस्थेचे सर्व कार्यकारीणी सदस्य, महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles