उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेकडून रिक्षा चालकांना आरोग्य किटचे वितरण.

सावंतवाडी : प्रवाशांच्या सेवेसाठी नेहमीच तत्पर असणारे तीन आसनी रिक्षा चालक यांचे आरोग्य उत्तम राहावे, या दृष्टीने त्यांना प्राथमिक उपचारासाठी लागणारे आरोग्य किट त्यांच्याजवळ असणे हे महत्त्वाचे आहे. त्या दृष्टिकोनातून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्यावतीने सावंतवाडी मळगाव रेल्वे स्थानक जवळील सुमारे 68. रिक्षा चालक मालक यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांच्या हस्ते आरोग्य किट भेट देण्यात आले.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने सावंतवाडी तालुक्यात विविध कार्यक्रम केले जात आहेत त्या पार्श्वभूमीवर आज 24 जुलै या दिवशी आज गुरुवारी रिक्षा चालकांचा असा सन्मान गौरव करण्यात आला.

24 ते 27 जुलै या कालावधीत वाढदिवसानिमित्ताने भरगच्च कार्यक्रमांच्या आयोजन. करण्यात आले आहे सावंतवाडी मळगाव रेल्वे स्थानक जवळील रिक्षा चालकांना आरोग्य किट भेटवस्तू देऊन आम्ही तुमच्या पाठीशी आहोत तुम्ही कधी ही हाक मारा निश्चितपणे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष तुम्हाला सहकार्य करेल, असे आश्वासन श्री. राऊळ यांनी दिले

शिवसेनेचे नेते चंद्रकांत कासार, तालुकाप्रमुख मायकल डिसोजा, अशोक धुरी, संदीप पांढरे, विनोद काजरेकर, सुनील गावडे, फिलिप्स रोड्रिक्स, गुणाजी गावडे नम्रता झारापकर, बाबू गावडे, प्रशांत बुगडे, शरद जाधव, नेमळे उपसरपंच राऊळ, मंथन गवस, रोहन मल्हार, संदीप भाईत, संजय धुरी, सचिन मुळीक, रिक्षा संघटना व सहा आसनी रिक्षा संघटना चालक-मालक, शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते..

(फोटो – सावंतवाडी येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्यावतीने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने रेल्वे स्थानक रिक्षाचालक वाहकांना आरोग्य कीट भेट देताना रुपेश रुपेश राऊळ, चंद्रकांत कासार, मायकल डिसोजा, अशोक धुरी, संदीप पांढरे, विनोद काजरेकर, बंड्या घोगळे. सुनील गावडे, फिलिप्स रोड्रिक्स, गुणाजी गावडे नम्रता झारापकर, बाबू गावडे, प्रशांत बुगडे, शरद जाधव, नेमळे उपसरपंच राऊळ, मंथन गवस, रोहन मल्हार, संदीप भाईत, संजय धुरी, सचिन मुळीक, रिक्षा संघटना व सहा आसनी रिक्षा संघटना चालक आदि.)

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles