सिधुदुर्गनगरी : राज्याच्या विधानसभेत अधिवेशन सुरू असतानाही शेतकरी आणि जनतेच्या बाबत राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे असंसदीय भाषा वापरतात, चक्क पत्याचा खेळ खेळतात!, भिकारी शासन म्हणणाऱ्या कृषी मंत्र्याना कृषीमंत्री म्हणून राहू नये. त्यांची कृषीमंत्री पदाची कारकीर्द वादग्रस्त ठरत आहे, या अशोभनीय कृतीमुळे राज्यभरातून त्यांच्याबाबत निदर्शने केली जात आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत रोष व्यक्त केला असून त्यांचा तात्काळ राजीनामा घेण्यात यावा, असे निवेदन सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्याकडे सादर केले आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी दखल न घेतल्यास आम्ही यापुढे अधिक तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा दिला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा, या मागणीसाठी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्याकडे निवेदन सादर केले. यावेळी पुंडलिक दळवी, देव्या टेमकर, सावली पाटकर, विवेक कुबल, उत्तम सराफदार, प्रा. सचिन पाटकर, जयेश धुमाळे, तेजस्विनी कदम, दीपिका राणे, ममता नाईक, सच्चिदानंद कनयाळकर, चंद्रकांत नाईक, अल्मेश शहा, गौतम महाले, उल्हास नाईक आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


