Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

एकनाथ खडसेंचे अनैतिक संबंध, तुमचे किस्से.! ; ‘ह्या’ आमदाराचा पत्रकार परिषदेत धक्कादायक आरोप, राजकीय वर्तुळात मोठी खळबळ.

जळगाव : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी अनेकदा भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका करत गंभीर आरोप केले, त्यानंतर आता एकनाथ खडसे यांच्याविरोधात भाजप आमदारांनी एकत्र येत जळगावमध्ये पत्रकार परिषद घेतली, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना आमदार मंगेश चव्हाण यांनी एकनाथ खडसे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. चव्हाण यांच्या या आरोपांनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

नेमकं काय म्हणाले मंगेश चव्हाण?  

माझा आपल्याला सवाल आहे आणि माझं आपल्याला सांगणं आहे. तुमच्याच मतदारसंघातील एका व्यक्तीने मला काही गोष्टी सांगितल्या, त्याची जर मी जाहीर वाचता केली तर आपल्याला बाहेर तोंड काढायला जागा राहणार नाही. मी त्या व्यक्तीला तुमच्यासमोर जाहीर पत्रकार परिषदेमध्ये देखील आणतो. त्याने मला असं सांगितलं की एकनाथ खडसे हे अतिशय खालच्या स्तराचा विचार करणारे नेते आहेत. पुढे तो असं म्हणाला मी त्यांना अतिशय जवळून पाहातो. वीस वर्षांच्या यांच्या इतिहासात यांनी अनेक लोकांना संपवलं. जवळच्या लोकांना यांनी संपवलं, यांनी राजकारणात तर हे केलच, परंतु यांनी अनेक महिलांशी अनैतिक संबंध ठेवले, मी हे जबाबदारीनं तुम्हाला सांगतो आहे. जसं तुम्ही लोढाचं सांगितलं, लोढानं तुम्हाला सांगितलं म्हणून तुम्ही ते आरोप करत आहात, तुमच्याविरोधात देखील मला अशाच काही लोकांनी येऊ सांगतिलं आहे, की एकनाथ खडसे यांचे अनेक महिलांशी संबंध होते. त्या महिला रात्र-रात्र यांच्याकडे येऊन राहायच्या, सकाळी लोकं त्यांना सोडायला जायचे, असा बघणारा व्यक्ती सांगत होता, असं मंगेश चव्हाण यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की,  मी मुक्ताईनगरमध्ये येतो, जाहीरपणे दोघे पत्रकार परिषद घेऊन एकमेकांसमोर येऊन बोलू, गिरीश महाजन यांच्यापेक्षा मी विकासाच्या बाबतीत सरस आहे, असं जर तुम्ही सिद्ध करून दाखवलं तर मी तुमचा सत्कार करायला मुक्ताईनगरमध्ये येईल. असं जाहीर आव्हान या पत्रकार परिषदेत मंगेश चव्हाण यांनी एकनाथ खडसे यांना दिलं आहे. यापुढे जर आपण वारंवार चुकीचं वक्तव्य करून पक्षाची प्रतिमा आणि नेत्यांची प्रतिमा खराब करत असाल तर तुम्हाला त्याच्यापेक्षा डबल उत्तर तुम्हाला मिळेल, असा इशाराही यावेळी चव्हाण यांनी खडसे यांना दिला आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles