सावंतवाडी : सावंतवाडी येथील राणी पार्वतीदेवी हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षक, वुमेन्स कॉलेजचे माजी प्राचार्य गिरीधर विश्वनाथ परांजपे यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस सोहळा आज शनिवार २६ जुलैला सायंकाळी ६ वाजता सावंतवाडीतील हॉटेल मँगो येथे आयोजित करण्यात आला आहे. शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य, पर्यावरण, अध्यात्म अशा सर्वच क्षेत्रात परांजपे यांनी कार्य केले आहे. भाषा, गणित आणि संस्कृत अशा तिन्ही विषयात पारंगत असलेल्या परांजपे यांनी जिल्ह्याच्या शैक्षणिक, पर्यावरण सामाजिक, क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस त्यांचे कुटुंबीय व आप्तेष्ट, मित्रमंडळी आणि माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत होणार आहे. ४२ वर्षांच्या आपल्या शिक्षकी पेशात त्यांनी अनेक विद्यार्थी घडविले आहेत.
माजी प्राचार्य गिरीधर परांजपे अमृतमहोत्सवी वाढदिवस आज.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


