सावंतवाडी : अखिल भारतीय प्रजापती महासंघाचे अध्यक्ष सतीश कुंकलेकर यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली. त्यामित्ताने सिंधुदुर्ग जिल्हा कुंभार समाजाच्या वतीने त्यांच्या मडगाव (गोवा) येथील निवासस्थानी जाऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कुंभार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष तथा बांधकाम समिती अध्यक्ष यशवंत शेदलकर, राज्य सरचिटणीस विलास गुडेकर, संपर्क प्रमुख प्रा. ॲड. गणपत शिरोडकर, राज्य पत्रकार आघाडी सचिव तथा बांधकाम समिती सचिव दिलीप हिंदळेकर, गोवा राज्य सचिव कैलास उत्तुरकर आदि उपस्थित होते.
यावेळी बोलताना कुंकलेकर यांनी अखिल भारतीय प्रजापती महासंघची माहिती दिली व आपल्या अध्यक्ष कालावधीत सिंधुदुर्ग कुंभार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. सिंधुदुर्ग जिल्हा कुंभार समाज व गोवा कुंभार समाज एकत्रित मिळून काम करण्या बद्दल माहिती दिली. अखिल भारतीय महासंघचे रु १२०० भरून आजीव सदस्य होण्यासाठी आवाहन केले. नियोजीत समाज भवनसाठी अखिल भारतीय महासंघच्या माध्यमातून सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


