Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

महाराष्ट्र हादरला! – महिलांना जंगलात नेऊन संबंध ठेवायचा, इच्छा पूर्ण होताच बनायचा यमराज! ; असा क्रूर खुनी कधी पाहिला नसेल.

जळगाव : आज तुम्हाला अशा एका व्यक्तीची हकीकत सांगणार आहोत, जो प्रथम विवाहित महिलांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा, त्यांच्यावर बलात्कार करायचा आणि नंतर त्यांचे जीव घ्यायचा. या भयंकर खुन्याचं नाव आहे अनिल संदानशीव.  या क्रूर व्यक्तीची संपूर्ण हकीकत अशी की, अनिल, एक चतुर आणि क्रूर शिकारी, जो आपलं शिकार अत्यंत शातिरपणे निवडायचा. त्याचं लक्ष्य होत्या विवाहित महिला. तो प्रथम त्यांच्याशी मैत्री करायचा, गोड बोलून त्यांचा विश्वास संपादन करायचा आणि हळूहळू त्यांच्या मनात स्थान मिळवायचा. त्याच्या मधुर बोलण्याने आणि खोट्या आश्वासनांनी महिला कोणत्याही संशयाशिवाय त्याच्या जाळ्यात अडकायच्या. त्यानंतर अनिल या महिलांना निर्जन जंगलात किंवा डोंगराळ भागात घेऊन जायचा.

तिथे तो प्रथम त्यांची लूटमार करायचा, मग त्यांच्यावर बलात्कार करायचा आणि शेवटी दगडांनी ठेचून त्यांची हत्या करायचा. मृतदेह तो जंगलाच्या खोलवर लपवायचा, जेणेकरून कोणताही पुरावा मिळू नये.

तिसऱ्या शिकारीची तयारी करत होता –

अनिलचा हे भयंकर काम तेव्हापर्यंत चालू होते, जोपर्यंत एका महिलेने त्याच्या क्रूरतेचा पर्दाफाश केला नाही. त्या दिवशी अनिलने आणखी एका महिलेला आपल्या जाळ्यात फसवलं होतं. तो तिला एका निर्जन जंगलात घेऊन गेला, जिथे त्याने आपले खरे हेतू उघड केले. पण यावेळी त्याचं नशीब त्याला साथ देईना. जेव्हा त्याने त्या महिलेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्या महिलेने धैर्य दाखवलं आणि त्याच्या पकडीतून सुटून पळण्यात यश मिळवलं. तिची ओरड ऐकून आजूबाजूचे ग्रामस्थ धावत घटनास्थळी पोहोचले. ग्रामस्थांनी अनिलला घेरलं आणि त्याला पकडलं. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली आणि अनिलला ताब्यात घेण्यात आलं.

पोलिसांच्या प्राथमिक तपासात असं समजलं की, अनिलने गेल्या एका महिन्यात किमान दोन महिलांची हत्या केली होती. त्याने दोन्ही मृतदेह जंगलात फेकले होते, जिथे पोलिसांनी शोध घेतल्यानंतर दोन मृतदेह सापडले.

पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी सांगितलं की, सर्वप्रथम जून महिन्यात शोभाबाई रघुनाथ कोळी यांचा मृतदेह सापडला होता. तपासात अनिल संदनशिव याला अटक झाली, ज्याने आपला गुन्हा कबूल केला. विशेष म्हणजे, पोलिसांनी त्याला तिसऱ्या हत्येचा प्रयत्न करताना रंगेहाथ पकडलं आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles