Sunday, November 9, 2025

Buy now

spot_img

बारावा दिवस – कै. साधना सुभाष गांवस. – भावपूर्ण आदरांजली.

बारावा दिवस – कै. साधना सुभाष गांवस. – भावपूर्ण आदरांजली.

कै. साधना सुभाष गांवस पूर्वाश्रमीच्या लीला चिटणीस. स्वातंत्र्य सैनिक मारूती चिटणीस यांच्या त्या कन्या. त्यांचे बालपण सावंतवाडी शहरातील माठेवाडा, सालईवाडा भागात गेलं. कळसुलकर इंग्लिश स्कूल, आरपीडीत त्यांनी शिक्षण घेतल. त्यावेळच्या त्या ११ वी मॅट्रिक होत्या. शिक्षणाची ओढ त्यांना होती. घेतलेलं ज्ञान फुकट जात नाही असं त्यांच म्हणणं होतं. अभ्यासूपणा व चिकाटी यामुळे त्याकाळी सरकारी नोकरीची संधीही त्यांना चालून आलेली. मात्र, परजिल्ह्यात जावं लागणार असल्यानं वडीलांनी नकार दिला अन् ती संधी हुकली. तद्नंतर व्यावसायिक सुभाष गांवस यांच्याशी त्यांचा विवाह झाला. अपार मेहनत, कष्ट, जिद्दीच्या जोरावर त्यांनी शुन्यातून विश्व उभारल. पती सुभाष यांना अर्धांगिनी म्हणून खंबीर साथ दिली. १९६५ मध्ये त्यांनी साधना टेलरींग क्लासेसची स्थापना केली. गेली ६० वर्ष या क्लासच्या माध्यमातून त्यांनी अनेक महिलांना शिवणकामाचे धडे दिले. महिलांनी स्वावलंबी असलं पाहिजे असा त्यांचा हेतू होता. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेकांनी शिवणकाम, विणकामाचे धडे घेत टेलरिंग व्यवसाय सुरू केलेत. महिलांनी मागे राहू नये हा त्यांचा हेतू होता.

‘मामी’ या नावानं त्या परिचित होत्या. रक्तापलिकडची नातीही त्यांनी रक्ताच्या नात्यापेक्षा अधिक जपली. आपल्या स्वभावान त्यांनी प्रत्येकाच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं होतं. घरी आलेला माणूस कधीही रिकाम्या हाती परतणार नाही याची काळजी त्या घेत. म्हणूनच, कोल्हापूर कणेरी मठाचे मठाधिपती परमपूज्य सद्गुरू काडसिद्धेश्वर महाराज यांनी त्यांना अन्नपूर्णा म्हणून संबोधले होते. काडसिद्धेश्वर महाराजांच्या त्या निस्सिम भक्त होत्या. सावंतवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी सदगुरु सिद्धरामेश्वर महाराजांचे शिष्य काडसिद्धेश्वर महाराज यांच्या उपस्थितीत आध्यात्मिक मठाची स्थापना करण्यात आली होती. या ठिकाणी गेली तिनं दशके नित्यनेमाने काकड आरती, भजन, दासबोध वाचन, नामस्मरण आदि आध्यात्मिक कार्यक्रम सुरू आहेत. ईश्वर हा मनुष्यातच वसला आहे, माणसातचं देव आहे हा गुरुंचा उपदेश त्यांनी इतरांना दिला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात भक्तीमार्गाचा प्रचार आणि प्रसार केला. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी गुरुंची सेवा केली. यासह धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांतही त्यांचा नेहमीच पुढाकार असायचा. ईश्वरावर त्यांची अपार श्रद्धा होती. आपल्या स्वभावान त्यांनी असंख्य माणस जोडली होती.‌ शुक्रवारी २५ जुलै २०२५ रोजी वयाच्या ८० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज त्यांना जाऊन १२ दिवस पूर्ण होत आहेत. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो‌ हीच परमेश्वराचरणी प्रार्थना… भावपूर्ण श्रद्धांजली….!

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles