देवगड : तालुक्यातील शेठ म. ग. हायस्कूल देवगड आणि अ. कृ. केळकर हायस्कूल, वाडा येथे दुर्ग मावळा प्रतिष्ठान व दुर्ग रक्षक प्रतिष्ठान रेडी यांच्या सहकार्याने इतिहासाची साधने व प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
इतिहास अभ्यासक व दुर्ग मावळा सदस्य ज्ञानेश्वर राणे यांचे इतिहासाची साधने यावर व्याख्यान व प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमांमध्ये राणे यांनी विद्यार्थ्यांना धोप, तलवार,वक्रधोप, कट्यार, वाघ नखे, दुदांडी, शिवराई होन ही साधने प्रत्यक्ष दाखवून विद्यार्थ्यांना त्या संबंधी माहिती देण्यात आली.
महाराजांच्या आरमारा विषयी माहिती दुर्गाची थोडक्यात माहिती, गड संवर्धन काळाची गरज, अकबरने काढलेले टोकन, मोडी लिपी पत्रे नमुने, वीरगळ, शिलालेख याविषयी माहिती सांगण्यात आली. व्याख्यान संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी सर्व साहित्य हाताळून प्रत्यक्ष अनुभूती घेतली
यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक , सहशिक्षक आणि दुर्ग मावळा प्रतिष्ठान मालवण तालुकाध्यक्ष प्रसाद पेंडूरकर उपस्थित होते.
देवगड येथे ‘इतिहासाची साधने व प्रदर्शन’ कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद. ; दुर्ग मावळा प्रतिष्ठान व दुर्ग रक्षक प्रतिष्ठान रेडी यांचे आयोजन.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


