सावंतवाडी : आज कुणकेरी येथील ग्रामस्थांनी बीएसएनएलच्या सततच्या होणाऱ्या अनियमित सेवेला कंटाळून त्याचा जाब विचारण्यासाठी सावंतवाडी येथील बीएसएनएलच्या जिल्हा मुख्य कार्यालयाला धडक दिली.

मागील दोन वर्षापासून कुणकेरी येथील बीएसएनएल ची सेवा विस्कळीत झाली आहे. या संदर्भात कित्येक वेळा निवेदने दिली गेली. परंतु त्याचा काडीमात्र फरक या बेफिकीर अधिकाऱ्यांना नाही.
वीज पुरवठा खंडित झाला असता BSNL चा टॉवर लगेचच बंद पडला जातो त्याला बॅटरी बॅकअप ची असणारी सिस्टम ही गेली 2 ते 3 वर्ष झाली बंद अवस्थेत आहे. या संदर्भात अधिकाऱ्यांना विचारणा केली असता ” आम्ही मागणी केली आहे, आमच्या कडे वस्तू आली तर आम्ही लावणार! आम्हाला भेटून काही होणार नाही तुम्ही खासदारांना भेटा त्यांना निवेदन दया अशी उडवाउडवीची उत्तरे या अधिकाऱ्यांकडून दिली गेली.
संतापलेल्या ग्रामस्थ्यांनी मात्र अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. आम्ही रिचार्ज पूर्ण महिन्याचे करतो आणि सेवा मात्र 20 दिवसच मिळत असेल तर तुमचा टॉवर बंद करून टाका पण लोकांचे नुकसान करून फुकट पैसे लाटण्याचा अधिकार तुम्हाला नाही अश्या कडक शब्दात अधिकाऱ्यांना सुनावले. व सेवा सुरळीत न झाल्यास येणाऱ्या स्वातंत्र्य दिनी कार्यालसमोर उपोषण करणार असल्या संदर्भात निवेदन देण्यात आले. त्यावेळी ग्रामस्थांमध्ये श्री मंगेश सावंत, भरत(भाऊ) सावंत, विनायक सावंत, विश्राम (बाळा) सावंत, अभिजीत सावंत, मनोज घाटकर, दादा खडपकर, एकनाथ सावंत, महादेव गावडे, विनोद सावंत, बाळकृष्ण सावंत, संदेश सावंत सहदेव घाटकर, सिताराम सावंत, नरेश परब, संजय लाड उपस्थित होते.


