सावंतवाडी : नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्या श्रीमती कल्पना बोवलेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
लोकमान्य टिळकांनी कुटुंबाचा, घरचा विचार न करता भारतभूमीच्या स्वातंत्र्याचा ध्यास त्यांनी मनात जपला होता, असे उद्गार विद्यालयाचे शिक्षक सी. टी. बंगाळ यांनी काढले. प्राचार्या श्रीमती कल्पना बोवलेकर यांनीही मनोगत व्यक्त केले.
पाचवी ते आठवी या लहान गटात प्रथम क्रमांक -अथर्व अर्जुन राऊळ, द्वितीय-वैष्णवी प्रशांत मुंडये, तृतीय-हर्षल लीलाधर राऊळ हिने क्रमांक प्राप्त केला.
नववी ते बारावी या मोठ्या गटातून प्रथम क्रमांक – भार्गवी घनश्याम आळवे, द्वितीय – वैष्णवी मदन राऊळ, तृतीय -सानवी लीलाधर राऊळ हिने क्रमांक प्राप्त केला. स्पर्धेत एकूण 19 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे परीक्षण लवू जाधव यांनी केले. सूत्रसंचालन राजेश गुडेकर यांनी केले व आभार एम.पी.सारंग यांनी मानले.


