नवी दिल्ली : बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांचं वेळापत्रक अखेर जाहीर केलं आहे. या स्पर्धेला दुलीप ट्रॉफीपासून सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा 28 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. तसेच 15 सप्टेंबरला या स्पर्धेचा शेवट होईल. दुलीप ट्रॉफी व्यतिरिक्त इराणी कप, रणजी ट्रॉफी, विजय हजारे ट्रॉफी, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी, सिनियर महिला टी20 ट्रॉफी आणि सिनियर महिला एकदिवसीय कप वेळापत्रकांचा समावेश आहे. रणजी ट्रॉफी पुन्हा एकदा दोन टप्प्यात आयोजित केली जाणार आहे. त्यानुसार, पहिला टप्पा ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये आयोजित केला जाईल. तर दुसरा टप्पा जानेवारी ते फेब्रुवारी २०२६ दरम्यान आयोजित केला जाईल. देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांचा पर्वाचा अंतिम क्रिकेट सामना वरिष्ठ महिला आंतर-झोनल मल्टी-डे स्पर्धेने संपेल. हा सामना 3 एप्रिल 2026 रोजी असेल.
पुरुषांचे 2025-26 देशांतर्गत स्पर्धांचं वेळापत्रक –
- दुलीप ट्रॉफी – 28 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर
- इराणी कप – 1 ते 5 ऑक्टोबर
- रणजी ट्रॉफी (एलिट) स्टेज 1 – 15 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर
- रणजी ट्रॉफी (एलिट) स्टेज 2 – 22 जानेवारी 2026ते 1 फेब्रुवारी 2026
- रणजी ट्रॉफी नॉकआउट फेरी – 6 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी
- रणजी ट्रॉफी (प्लेट लीग) – 15 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर
- रणजी करंडक (प्लेट फायनल) – 22 जानेवारी 2026 ते 26 जानेवारी 2026
- सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (एलिट) – 26 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर
- सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (प्लेट) – 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर
- विजय हजारे ट्रॉफी (एलिट) – 24 डिसेंबर ते 18 जानेवारी
- विजय हजारे ट्रॉफी (प्लेट) – 24 डिसेंबर ते 6 जानेवारी
- विनू मंकड ट्रॉफी – 9 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर (एलिट), 9 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर (प्लेट)
- कर्नल सीके नायडू ट्रॉफी (एलिट) – 16 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर (टप्पा 1), 23 जानेवारी ते 2 फेब्रुवारी (टप्पा 2), 21 फेब्रुवारी ते 12 मार्च (नॉकआउट)
- कर्नल सीके नायडू ट्रॉफी (प्लेट) – 16 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर (टप्पा 1), 23 जानेवारी ते 2 फेब्रुवारी (टप्पा 2), 6 ते 9 फेब्रुवारी (अंतिम)
- पुरुषांची 19 वर्षाखालील एकदिवसीय चॅलेंजर ट्रॉफी – 5 ते 11 नोव्हेंबर
- पुरुषांची अंडर 23 राज्य अ करंडक – 9 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर (एलिट), 9 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर (प्लेट)
- कूचबिहार ट्रॉफी – 16 नोव्हेंबर ते 20 जानेवारी (एलिट), 16 नोव्हेंबर ते 27 डिसेंबर (प्लेट)
- विजय मर्चंट ट्रॉफी – 7 डिसेंबर ते 28 जानेवारी (एलिट), 7 डिसेंबर ते 7 जानेवारी (प्लेट)
- महिलांचे स्पर्धा आणि सामने –
- सिनियर महिला टी20 ट्रॉफी – 8 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर (एलिट), 8 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर (प्लेट)
- वरिष्ठ महिला एकदिवसीय करंडक – 6 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी (एलिट), 6 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी (प्लेट)
- महिला अंडर-19 टी20 ट्रॉफी – 26 ऑक्टोबर ते 12 नोव्हेंबर (एलिट), 26 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर (प्लेट)
- वरिष्ठ महिला इंटरझोनल टी20 ट्रॉफी – 4 ते 14 नोव्हेंबर
- महिला अंडर 23 टी20 ट्रॉफी – 24 नोव्हेंबर ते 11 डिसेंबर (एलिट), 24 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर (प्लेट)
- महिला अंडर-19 एकदिवसीय करंडक – 13 डिसेंबर ते 1 जानेवारी (एलिट), 13 डिसेंबर ते 23 डिसेंबर (प्लेट)
- महिला अंडर 15 एकदिवसीय करंडक – 2 ते 21 जानेवारी (एलिट), 2 ते 12 जानेवारी (प्लेट)
- महिला अंडर 23 एकदिवसीय करंडक – 3 ते 22 मार्च (एलिट), 3 ते 13 मार्च (प्लेट)
- वरिष्ठ महिला आंतर-विभागीय एकदिवसीय करंडक – 5 ते 15 मार्च
- वरिष्ठ महिला आंतरजिल्हा बहुदिवसीय करंडक – 20 मार्च ते 3 एप्रिल


