Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

पिंगुळीने घातला आदर्श!, सर्वांची मिळून होणार एकच दहिहंडी.! ; मान्यवरांची यशस्वी शिष्टाई, सरपंच अजय आकेरकर यांचा पुढाकार.

कुडाळ : दही-काला उत्सव महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पारंपारिक वारसा असणाऱ्या या सणाला युवा वर्ग मोठ्या संख्येत सहभागी होत असतो. पिंगुळी गावात गेली तीन वर्षे एकच दहीहंडी साजरी केली जात होती. परंतु गेल्या वर्षी काही युवा मंडळाकडून स्वतंत्र दहिहंडी उत्सव साजरा करण्यात आला.
पिंगुळी गावात एकच मोठी मानाची दहिहंडी असावी अशी बर्‍याच मान्यवर व्यक्तीची इच्छा होती.
त्या साठी सरपंच अजय आकेरकर यांनी पुढाकार घेवुन पिंगुळीतील सर्व मंडळाची एकत्रीत बैठक आयोजित करुन गावातील मान्यवर व्यक्तीच्या समक्ष मंडळाचे समज- गैरसमज, त्रुटी दुर करण्यात आल्या. यापुढे गावात एकच दहीहंडी उत्साहात साजरी करण्याचे सर्वानुमते ठरले. यावेळेस सरपंच अजय आकेरकर, सदस्य शशांक पिंगुळकर, मिलिंद परब,प्रदीप माने, धीरज परब, सागर रणसिंग, सतिश धुरी,राजन पांचाळ, राघोबा धुरी आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच सखे सोबतीचे सतिश माडये, भुषण तेजम, मंगेश चव्हाण, अमित तेंडुलकर,प्रिय दर्शन कुडव, वड गणेश मित्र मंडळाचे दत्ता पाटील, स्वस्तिक प्रतिष्ठान चे सचिन गुंड, चेतन राऊळ, सिद्धीविनायक मंडळाचे रोहन परब , युवा प्रतिष्ठान चे केतन शिरोडकर यांच्या सह मोठ्या संख्येने युवा वर्ग उपस्थित होता. यावर्षी गावातील सर्व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने दहीहंडी उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles