सावंतवाडी : आकेरी गावडेवाडी येथील प्रल्हाद गावडे यांच्या सतर्कतेमुळे नेमळे येथील महिलेचे मंगळसूत्र परत मिळाले यामुळे नेमळे गावातून गावडे याचे कौतुक होत आहे. गुरु पौर्णिमेदिवशी नेमळे देऊळ वाडी येथील भिकाजी (नाना ) कलांगण आणि त्यांची पत्नी सीताबाई कलांगण ह्या सावंतवाडीवरून आकेरी मार्गे घरी येत असताना आकेरी येथील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात दुचाकी गाडी गेली यावेळी सौ कलांगण यांच्या हातातील पर्स रस्त्यावर कधी पडली हे त्यांना कळले नाही घरी येऊन बघितल्यावर आपली पर्स कुठेतरी पडली हे पतीला सांगितल्यावर त्यांनी शोधाशोध केली मात्र त्यांना पर्स मिळाली नाही. मात्र याच वेळी आकेरी गावडे वाडी येथील युवक प्रल्हाद गावडे कलांगण यांच्या मागून घरी येत असताना त्याला ती पर्स मिळाली त्यात असलेल्या आधारकार्डवरील पत्त्यावरून कलांगण यांच्याशी संपर्क करून त्या पर्समध्ये आसलेले मंगळसूत्र, आधार कार्ड, ये टी एम कार्ड,कलांगण यांच्या घरी नेऊन दिले यावेळी कलांगण आणि त्यांच्या पत्नी यांनी प्रल्हाद गावडे यांचे आभार मानून कौतुक केले.

तसेच 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी नेमळे ग्रामपंचायत येथे बोलावून ध्वजारोहण होताच प्रल्हाद गावडे यांचे भिकाजी (नाना) कलांगण यांनी नेमळे सरपंच दीपिका भैरे, उपसरपंच सखाराम राऊळ यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी नेमळे गावातील ग्रामस्थ सर्व शाळातील मुले, शिक्षक, आरोग्यसेवक, तलाठी, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तंटामुक्ती अध्यक्ष, ग्रामपंचायत कर्मचारी, सदस्य आदि उपस्थित होते. यावेळी प्राथमिक शिक्षिका श्रेया परब यांनी शाळेतील मुलांना प्रल्हाद गावडे यांचा आदर्श प्रत्येकाने जोपसावा, असा प्रामाणिकपणा असेल तर तुम्ही जीवनात कुठेच कमी पडणार नाही, असे सांगून प्रल्हाद गावडे यांचे कौतुक केले.


