Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

केंद्रशाळा मठ नंबर १ येथे माजी विद्यार्थी मेळावा उत्साही वातावरणात संपन्न.

वेंगुर्ला : कै. रायसाहेब डॉ. रामजी धोंडजी खानोलकर केंद्रशाळा मठ नंबर १ शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळावा श्री स्वयंभू मंगल कार्यालय मठ येथे माजी विद्यार्थी आणि शिक्षणाधिकारी डॉ गणपती कमळकर, वेंगुर्ले तालुका गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी, मठ ग्रामपंचायत सरपंच रुपाली नाईक यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या विद्यार्थ्यांनी ईशस्तवन, स्वागतगीत म्हणून केली. मान्यवारांच्या हस्ते दीपप्रज्वलन व शारदेला हार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मठ ग्रामपंचायतच्या सरपंच रुपाली नाईक यांनी स्वीकारलं. मान्यवर व माजी विद्यार्थ्यांच्या स्वागतानंतर प्रशालेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक अजित तांबे यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर माजी विद्यार्थी आबा मठकर, उत्तमभाई मोबरकर, रवींद्र खानोलकर, रंजन कडुलकर यांनी आपली मनोगते व्यक्त केली. शेवटी प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ कमळकर साहेब यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यानंतर अध्यक्षीय भाषण झाले.
माजी विद्यार्थ्यांच्याकडून शाळेचा शाळेचा सुसज्ज हॉल बांधून देण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. यासाठी श्री.रामदास खानोलकर यांनी २५००₹ ची देणगी वडिलांच्या स्मरणार्थ यावेळी दिली. शाळेचे पदवीधर शिक्षक गणेश नाईक यांच्या वेंगुर्ल्यातील गडकिल्ले व शिव दिनविशेष पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या माजी विद्यार्थी मेळाव्याला प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ गणपती कमळकर, वेंगुर्ला गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी, तुळस बीट शिक्षण विस्तार अधिकारी रामचंद्र कोनकर, मठ केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष न्हानू गावडे, उपाध्यक्षा तेजस्विनी गुरव, माजी व्यवस्थापन समिती अध्यक्ष विनोद रंगनाथ शेणई, राघोबा मुकुंद ठाकूर, वैभवी विजय गावडे, सुशिला संतोष नांदोस्कर, संतोष काशिनाथ तेंडोलकर, माजी विद्यार्थी, पालक व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या उपशिक्षिका प्रतिमा साटेलकर यांनी तर आभार उपशिक्षक पांडुरंग चिंदरकर सरांनी मानले. शाळेतर्फे सर्व माजी विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles