कणकवली : येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात कनक नियतकालिक विभागाच्या वतीने काढलेल्या कनक भित्तिपत्रकाचे आणि विज्ञान विभागाने प्रसिद्ध केलेल्या विज्ञान विशेष भित्तिपत्रकाचे विमोचन शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे आणि किमान कौशल्य अभ्यासक्रमाचे विभाग प्रमुख राजू जामदार यांच्या हस्ते करण्यात आले.
कणकवली महाविद्यालयात कनक नियतकालिक विभागाने स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त मागील ५५ वर्षांपासून भित्तीपत्रकाची परंपरा कायम राखली आहे.
भारतीय प्रजासत्ताकाच्या ७९ व्या वर्धापन दिनानिमित्त दोन भित्तिपत्रकाचे विमोचन करण्यात आले.
(फोटो – कणकवली महाविद्यालयात कनक भित्तिपत्रकाचे विमोचन करताना शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे ,समवेत प्राचार्य युवराज महालिंगे, प्रा . राजू जामदार, प्रा.महादेव माने, डॉ. सोमनाथ कदम, श्री संजय ठाकूर,प्रा. दीपा तेंडोलकर, प्रा. विजयकुमार सावंत, प्रा. माधुरी राणे आदि.)
विज्ञान विभागामार्फत आरोग्य सेवा, विकास व उत्क्रांती या विषयावर आधारित भित्तिपत्रक तयार करण्यात आले. तर कनक भितीपत्रकामध्ये विविध विद्यार्थ्यांनी लिहिलेले कविता लेख कविता लेख छायाचित्र प्रदर्शित करण्यात आले आहेत.
विमोचन प्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य युवराज महालिंगे, कनक नियतकालिक विभागप्रमुख डॉ. सोमनाथ कदम, पर्यवेक्षक महादेव माने कनक विभाग व विज्ञान विभागातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.


