मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून राज्यात मुसळधार पावसाने चांगलंच झोपडपून काढलंय. अशातच मुंबईसह राज्यातील पावसासंदर्भातील परिस्थितीचा आढावा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घेण्यात आला आहे. राज्यातील पावसाबाबत राज्यातील अधिकाऱ्यांसोबत संवाद साधला. 18 ऑगस्ट ते 21 ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. राज्यातील 15 ते 16 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून रेड आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
यापार्श्वभूमीवर जिथे रेड अलर्ट आहे त्या जिल्ह्यांमध्ये उपाययोजना केल्या जात असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आलीये.
दरम्यान, कोकणात रेड अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आली. पुढे ते असेही म्हणाले की कोकणातील अंबा, कुंडलिका, जगबुडी या नद्यांनी इशारा पातळी ओलंडली आहे, त्यामुळे या भागातील परिस्थितीवर विशेष लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले.


