सावंतवाडी : भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून याही वर्षी देखील सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात भजन मंडळांना मोफत भजन साहित्य वाटप करण्यात येणार आहे. यासाठी इच्छूक भजन मंडळांनी भाजप मंडळ अध्यक्षांशी संपर्क साधावा, असे आवाहन संदिप गावडे यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
भजन साहित्य वाटपाचा कार्यक्रम २४ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला असून कार्यक्रमाचे ठिकाण व वेळ लवकरच जाहीर केली जाणार आहे.
याबाबत खास सूचना देताना सांगण्यात आले की –
१) मागील वर्षी साहित्य लाभ घेतलेल्या भजन मंडळांना यावर्षी लाभ मिळणार नाही.
२) भजन मंडळांनी उपलब्ध भजन साहित्य चौकशी तत्सम मंडल अध्यक्षांच्या संपर्क साधून करावी.


