सावंतवाडी : सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या संचालकपदी विष्णू गावडे आणि सगुण जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे. दोन संचालकांचे निधन झाल्यामुळे रिक्त झालेल्या पदांसाठी ही निवडणूक घेण्यात आली होती. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहकारी निवडणूक अधिकारी राजन आरविंदेकर यांनी काम पाहिले.
या संघाचे संचालक प्रभाकर राऊळ आणि भगवान जाधव यांच्या निधनामुळे दोन जागा रिक्त झाल्या होत्या. सहकार उपनिबंधकांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी राजन आरविंदेकर यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. संघाच्या कार्यालयात ही निवडणूक पार पडली.

(फोटो – सावंतवाडी सहकारी खरेदी विक्री संघावर विष्णू गावडे व सगुण जाधव बिनविरोध निवड झाली यावेळी शुभेच्छा देताना चेअरमन प्रमोद गावडे, व्हाईस चेअरमन रघुनाथ रेडकर व मान्यवर संचालक.)
सहकार संस्था मतदारसंघातून विष्णू लवू गावडे (माजगाव चिपटेवाडी) आणि अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून सगुण खेमा जाधव (तळवडे) यांनी महायुतीच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या दोन जागांसाठी फक्त दोनच अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली.
या निवडीच्या वेळी संघाचे चेअरमन प्रमोद गावडे, व्हाईस चेअरमन रघुनाथ रेडकर, संचालक प्रवीण देसाई, प्रमोद सावंत, आत्माराम गावडे, दत्ताराम हरमलकर, ज्ञानेश परब, शशिकांत गावडे, विनायक राऊळ, आनारोजीन लोबो, रश्मी निर्गुण, दत्ताराम कोळमेकर, नारायण हिराप, अभिमन्यू लोंढे, व्यवस्थापक महेश परब आदी उपस्थित होते.
यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी राजन आरविंदेकर यांनी दोघांची निवड जाहीर केली. त्यानंतर चेअरमन प्रमोद गावडे,व्हाईस चेअरमन रघुनाथ रेडकर, आनारोजीन लोबो व संचालकांसह शिवसेना माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुका प्रमुख नारायण राणे, संदेश सोनुर्लेकर आदी मान्यवांनी नवनिर्वाचित संचालकांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.


