मनसेचे आंदोलन फळास, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध दारूसाठा जप्त. ; साडे पाच लाखापेक्षा अधिक मुद्देमाल जप्त.

कुडाळ : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनानंतर आतापर्यंत उत्पादन शुल्क विभागाने चौविस जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून, एक वाहन ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच आतापर्यंत पाच लाख,अडसष्ठ हजार ,तिनशे विस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आणि सात जणांविरुद्ध प्रतिबंधक कारवाईसाठी प्रस्ताव वरिष्ठाकडे पाठवण्यात आले आहेत.


मनसेकडून फेब्रुवारी 2025 मध्ये निवेदन देऊन अवैध दारू विक्री व वाहतुकी बाबत कारवाईची मागणी केली होती, परंतू पाच ते सहा महिन्यानंतर कारवाई न झाल्याने मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या नेतृत्वाखाली, उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, तालुकाध्यक्ष हेमंत जाधव, उप तालुकाध्यक्ष गजानन राणे, जगन्नाथ गावडे यांच्या सहकार्यकर्त्यांनी दारुनी भरलेल्या बाटल्याचा हार निरीक्षक उत्पादन शुल्क अधिकारी यांच्या गळ्यात घालून आंदोलन केले होते.

त्यानंतर खडबडून जागे झालेल्या उत्पादन शुल्क कुडाळ विभागाची कारवाई जोरात सुरू असून मनसे याबाबत सातत्याने पाठपुरावा करीत आहे. अवैद्य दारू विक्री व वाहतूक करणाऱ्या माफीयांचे मात्र यामुळे धाबे दणानलेले आहेत, हे मात्र नक्की!

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles