सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली येथील मटका अड्ड्यावर पालकमंत्री नितेश राणे यांनी स्वतः धाड टाकल्यानंतर सिंधुदुर्ग पोलीस ॲक्शन मोडवर गेले आहेत. जिल्ह्यातील सर्व मटका जुगार अड्डे थांबवले गेले असून दर दिवशी होणारा लाखो रुपयांचा चुराडा या कारवाईमुळे थांबविला गेला आहे. कणकवलीचे पोलीस निरीक्षक यांचे या प्रकरणात झालेले निलंबन जिल्ह्यातील सर्व अवैध धंद्यांना रोखण्यासाठी महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यां विरोधात जिल्ह्यात पोलिसांनी छापेमारी सुरू केली आहे. ठिकठिकाणी नाकाबंदी केली जात आहे. व यात गुंतलेल्या संशयित गुन्हेगारांचे अटक सत्र सुरू झाले आहे.
जिल्ह्यातील दारू मटका जुगार या अवैध धंद्यांवर पोलीस दलाने छापेमारी सुरू केली आहे. अनेक ठिकाणी या कारवाया पोलिसांनी केल्या आहेत. कणकवली मधील घेवारी यांच्या मटका अड्ड्यावर पालकमंत्र्यांनी घातलेली धाड जिल्ह्यातील सर्व बेकायदेशीर कृत्ये रोखण्यासाठी दिशा देणारी ठरली आहे. बेकायदेशीर दारू,मटका जुगार, चरस गांजा अशा नशेली पदार्थांच्या रॉकेट मुळे सिंधुदुर्गची भावी पिढी बरबाद होता नये यावर पोलिसांनी अंकुश ठेवावा असे स्पष्ट आदेश पालकमंत्री नितेश राणे यांनी सर्व पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन दिले होते. माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशा बेकायदेशीर कृत्यामुळे लाखो रुपयांचा चुराडा होत आहे व भावी पिढीचे त्यात मोठे नुकसान होत आहे याबाबत गांभीर्याने घ्यावे असे स्पष्ट निर्देशाने दिले होते. आता पोलिसांनी जिल्ह्यातील असे बेकायदेशीर अड्डे व ते चालवणारे नेटवर्क मोडण्यासाठी संपूर्ण जिल्हाभर छापेमारी सुरू केली आहे.
पोलीस दलाचे प्रमुख जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहीकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणी व स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा अशा यंत्रणेकडून शनिवारी दिवसभर जिल्हाभर या कारवाया करण्यात आल्या आहेत. संशयित आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल झाले असून अटक सत्र ही सुरू झाल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.
पालकमंत्री नितेश राणे यांच्या दणक्यानंतर पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर! ; जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात अनेक ठिकाणी पोलिसांची छापेमारी, गुटखा, अवैध दारू विक्रीवरही कारवाई!
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


