सावंतवाडी : गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला भजनी मंडळांना प्रोत्साहन देऊन. सांस्कृतिक चळवळ सुरू ठेवण्याच्या हेतूने प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षी देखील संदिप गावकडे यांच्यामार्फत भजनी मंडळांना साहित्य वाटप करण्यात आले. सावंतवाडी शहर व आंबोली मंडलातील एकूण ५० मंडळांना साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी सावंतवाडी नगर परिषदेचे माजी नगरसेवक व सभापती ॲड. परिमल नाईक, जिल्हा बँक संचालक रवी माडगावकर, सावंतवाडी खरेदी विक्री संघ अध्यक्ष प्रमोद गावडे, आंबोली मंडल अध्यक्ष संतोष राऊळ, माजी जिल्हा परिषद सदस्य पंढरी राऊळ, पंकज पेडणेकर आदी मान्यवर तसेच सावंतवाडी व आंबोली मंडलमधील सर्व भजनी मंडळांचे सदस्य उपस्थित होते.


