सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गचे विद्यमान जिल्हाधिकारी अनिल पाटील 31 ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी जिल्हा परिषद सांगली येथे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर असणाऱ्या श्रीमती तृप्ती धोडमिसे यांची शासनाने आज रोजी जिल्हाधिकारी पदी नियुक्ती केलेली आहे
.
श्रीम. तृप्ती धोडमिसे सध्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जिल्हा परिषद सांगली येथे कार्यरत आहेत. त्यांच्या जागी विशाल नरवाडे यांची नियुक्ती झाली असून श्रीमती तृप्ती धोडमिसे यांची नियुक्ती सिंधुदुर्गच्या नव्या जिल्हाधिकारी पदी करण्यात आलेली आहे. तृप्ती धोडमिसे या 2018 च्या बॅचच्या आयएएस आहेत.
दरम्यान, तत्कालीन महिला जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी नंतर पुन्हा एकदा सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी म्हणून एक महिला अधिकारी कार्य करताना पहावयास मिळणार आहे.


