Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

युरेका आउटसोर्सिंग प्रायव्हेट लिमिटेडचा रोजगार निर्मितीचा प्रकल्प कौतुकास्पद! ; मायक्रोसॉफ्टचे माजी संचालक बेहरे यांचे प्रतिपादन.

सावंतवाडी : कोकणात बुद्धिमत्ता आहे, येथील तरुण कष्टाळू आणि मेहनती आहेत मात्र या तरुणांना योग्य मार्गदर्शन व स्थानिक रोजगार नसल्यानेच पुणे मुंबईला जावे लागते मात्र येथे रोजगार निर्माण झाल्यास निश्चितच येथील तरुण या प्रकल्पात मोठे योगदान देऊ शकतील यासाठीच येथील काही तरुणांनी स्थानिक मुलांना रोजगार देण्यासाठी सुरू केलेला युरेका आऊटसोर्सिंग हा प्रकल्प सावंतवाडीतील तरुणांना दिशादर्शक ठरेल असा आशावाद सिंधुदुर्गचे सुपुत्र तथा मायक्रोसॉफ्टचे सेवानिवृत्त संचालक वासुदेव बेहेरे यांनी येथे केले.

येथील सुशांत पास्ते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी OSSEED टेक्नॉलॉजीच्या आणि युरेका आऊटसोर्सिंग प्रायव्हेट लिमिटेड च्या माध्यमातून येथील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी या रोजगार केंद्राची नुकतीच सुरुवात केली असून या केंद्राला श्री बेहेरे उभयतांनी आज मंगळवारी शुभेच्छा भेट दिली त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना श्री बेहरे बोलत होते.
ही भेट घडवून आणणारे पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते मोहन जाधव यांनी ही भेट घडून आणण्याचा आपला उद्देश सांगून या तरुणांना माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात मोठा लौकिक मिळविलेल्या बेहेरे साहेबांचे मार्गदर्शन मिळावे यासाठीच ही भेट आपण घडवून आणल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी बेहेरे यांनी सद्यस्थितीत माहिती क्षेत्रातील स्पर्धा सांगून ए आय च्या जमान्यात अत्याधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून कोकणातील तरुणांनी कोकणातच रोजगाराचे जाळे निर्माण करावे असे सूचित केले.
कोकणात आयटी क्षेत्रातही अनेक संधी त्यांनी सांगून यासाठी तरुणांनी पुढे आल्यास अनेक रोजगाराची निर्मिती येथे होऊ शकेल असे सांगून भविष्यात सावंतवाडी रोजगाराचे मोठे केंद्र बनेल असा आशावाद व्यक्त केला. या प्रकल्पासाठी आवश्यक असणारे सहकार्य करण्याची ग्वाही दिली व मोहन जाधव यांनी ही अनपेक्षित भेट घडून आणल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून त्यांनी समाधान व्यक्त केले.

OSSEED टेक्नॉलॉजी चे संचालक सुशांत पास्ते, सहकारी मायकल डिसोझा, विनायक जाधव, HR- मनिष जाधव, आय टी हेड -साहिल नाईक यांनी स्वागत करून आपण या ठिकाणी हा प्रकल्प का सुरू केला याबाबत माहिती दिली. उद्योजक मायकल डिसोझा यांनी कोकणातील बेकारीची अवस्था सांगून बेकारीवर फुंकर घालण्यासाठीच आपण प्रयत्न केले ते सांगून भविष्यात आपण लावलेले रोपटे तुमच्या मार्गदर्शनाने वटवृक्षात रूपांतरीत व्हावे त्यासाठी आपलं मार्गदर्शन आणि योगदान सातत्याने मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली व आभार व्यक्त केले. यावेळी Business Analyst- विनायक जाधव यांनी या नव्या प्रकल्पाची संपूर्ण माहिती देऊन आपल्या ज्ञानाचा आपल्या बुद्धिमत्तेचा आणि ओळखीचा ही फायदा या प्रकल्प उभारण्यासाठी मेळावा अशी अपेक्षा व्यक्त करून सुरुवातीला येथे 50 तरुणांना सध्या रोजगार देण्याचा प्रयत्न आहे भविष्यात तो 200 पर्यंत करण्याच्या अनुमती मिळाल्याचे सांगून त्यासाठी स्थानिक तरुणांनी हे सकारात्मक सहकार्य करावे असे आवाहन केले.
यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सौ संगीता बेहेरे, आजगाव शाळेच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका ममता जाधव, युरेका आऊट सोर्सिंग कंपनीचे व्यवस्थापक अंकित कदम, टीम लीडर विक्रम निकम, कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles