सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आपल्या सावंतवाडी येथील निवासस्थानी श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करून पूजा केली. त्यांच्या निवासस्थानी केसरकर कुटुंबीय दीड दिवस ही पूजा करतात.

आमदार दीपक केसरकर, माजी नगराध्यक्षा पल्लवी केसरकर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पुरोहितांच्या मंत्रोच्चारात गणेशाची आराधना केली. परंपरेनुसार त्यांचे कुटुंब अनेक वर्षांपासून चालत आलेल्या रुढी आणि परंपरा जपत श्री गणेश पूजा करतात. यावेळी, कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र येऊन गणेशाची आराधना करत आशीर्वाद घेतले. यावेळी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात व राज्यातील जनतेला सुखी, समाधानी ठेव, सर्वांच्या मनोकामना पूर्ण करा!, असं साकडं श्री केसरकर यांनी घातलं.


