Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

Accident – भीषण अपघातात ९ प्रवासी गंभीर. ; मद्यधुंद प्रवाशानं ड्रायव्हरकडून स्टेअरिंग हिसकावलं, अन्…

मुंबई : एका धक्कादायक घटनेनं मुंबई हादरली आहे. मुंबईतील गजबजलेल्या लालबाग परिसरात बसनं अनेक वाहनांना धडक दिली आहे. या अपघातात ९ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. बेस्टची ६६ क्रमांकाची बस लालबागमध्ये गेल्यानंतर बसमधून प्रवास करणाऱ्या एका मद्यधुंद प्रवाशानं ड्रायव्हरसोबत झटापट करण्यास सुरुवात केली. त्यानंतर या प्रवाशानं ड्रायव्हरचं स्टेअरिंग हिसकावून घेतलं, त्यामुळे बस अनियंत्रित होऊन हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.

एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत जखमी झालेल्या नऊ पादचाऱ्यांपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम ही बृहन्मुंबई महानगरपालिकेची वाहतूक शाखा आहे. मद्यधुंद प्रवाशानं केलेल्या कृत्यामुळे बस चालकाचं वाहनावरील ताबा सुटल्याने शहरातील लालबाग परिसरात पादचारी, कार आणि दुचाकींची धडक बसली. काळाचौकी पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण मुंबईतील बॅलार्ड पिअर येथून एक इलेक्ट्रिक बस सायनमधील राणी लक्ष्मीबाई चौकाकडे जात असताना ही घटना घडली.

मद्यधुंद प्रवाशानं चालकाकडून स्टेअरिंग हिसकावलं –

बेस्ट प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, प्राथमिक माहितीनुसार, ६६  क्रमांकाची बस राणी लक्ष्मी चौकच्या दिशेनं जात असताना गणेश टॉकीजच्या दरम्यान एका दारुड्या प्रवाशानं वाहकाबरोबर झटापट केली. त्यानंतर वाहकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि बस अनियंत्रित होऊन फुटपाथच्या दिशेनं गेली. या दरम्यान, फुटपाथवरुन जाणारे काही पादचारी जखमी झाल्याचं समजलं आहे. पोलिसांनी बसमधील दारुड्या प्रवाशाला ताब्यात घेतलं आहे. त्यासोबतच, वाहक आणि चालक यांना काळाचौकी पोलीस स्टेशनला नेण्यात आलं आहे. आतापर्यंत एवढीच माहिती मिळाली असून सविस्तर माहिती नंतर कळवण्यात येईल.

नेमकं काय घडलं? 

बेस्ट प्रशासनाची 66 क्रमांकाची बस बॅलार्ड पियरच्या दिशेनं  राणी लक्ष्मीबाई चौक सायन इथे जात होती. या बसमधून एक मद्यधुंद प्रवासी प्रवास करत होता. त्यानंतर तो प्रवासी बसमधील चालकाशी हुज्जत घातल होता. लालबाग येथील गणेश टॉकीज परिसरात बस पोहोचली आणि तेवढ्या त्या प्रवाशानं अचानक स्टेअरिंग पकडलं. त्यामुळे चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं. अनियंत्रित बसनं दोन मोटारसायकल, एक कार आणि अनेक पादचाऱ्यांना धडक दिल्याची माहिती मिळत आहे. या अपघातात आतापर्यंत नऊजण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेतील तीन जण गंभीर जखमी आहेत. यातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. सर्व जखमींना शहरातील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मद्यधुंद प्रवाशाला ताब्यात घेण्यात आलं असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles