मुंबई : मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाची हाक दिली आहे. या मागणीसाठी त्यांनी मुंबईतील आझाद मैदानावर एल्गार पुकारला आहे. त्यांच्यासोबत १० ते १२ हजार आंदोलक सहभागी झाले आहेत. आझाद मैदानावर पोहोचल्यानंतर जरांगे पाटील यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. आता मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील यांनी आता शेवटची फाईट होणार असे स्पष्ट भाषेत सांगितले.
मुंबईवर आमचा हक्क नाही का?, आर्थिक राजधानीत येऊन गोर गरीबांची लेकर सुखा-समाधानाने जगावे असं सरकारला वाटत नाही का?, आम्ही पैसे मागायला आलो का?, आमचे हक्काचे आरक्षण मागायला आलो आहोत, ते द्यायचं नाही. तुमची ती भाषणबाजी आताहे पुरे झाली. आता नाही. आता फुल्ल अँड फाईट, शेवटची फाईट होणार!, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.


