Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

ज्ञान जिज्ञासा फाऊंडेशन व फ्लोरेट कॉलेजचा ‘आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार’ जाहीर! ; ‘हे’ आहेत मानकरी!

कणकवली :  “शिका कोकणात, कमवा मुंबईत” हे प्रेरणादायी ब्रीदवाक्य घेऊन कार्यरत असलेली ज्ञान जिज्ञासा फाऊंडेशन व फ्लोरेट कॉलेज ऑफ डिझाईनिंग, कणकवली ही शैक्षणिक संस्था नेहमीच नव्या वाटा शोधत विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य करत आहे. या संस्थेच्या वतीने यंदाचा आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला असून, समाजप्रबोधन व शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान दिलेल्या मान्यवर शिक्षकांचा या पुरस्कारांतर्गत सन्मान होणार आहे.

‘हे’ मान्यवर ठरले ‘आदर्श शिक्षक’ –

1. मंदार यशवंत सुतार – कॉर्पोरेट ट्रेनर व शैक्षणिक नवोन्मेषक, मुंबई

2. सुमंत दत्ताराम दळवी – प्राचार्य, माध्यमिक विद्यामंदिर कनेडी कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स

3. वामन रामचंद्र तर्फे – मुख्याध्यापक, त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय, शिरवंडे (ता. मालवण)

4. पी. जे. कांबळे – मुख्याध्यापक, विद्यामंदिर हायस्कूल, कणकवली

5. राखी देवदत्त अरदकर – कला शिक्षिका,  टोपीवाला हायस्कूल, मालवण

6. दत्तात्रय मारुती केसरकर – गुरुकुल अकॅडेमी, कणकवली

ज्ञान जिज्ञासा फाऊंडेशनचे संस्थापक सचिन बोराटे व फ्लोरेट कॉलेजच्या संचालिका श्रीम. सार्था कदम यांनी या निवडीची घोषणा केली.

या पुरस्काराद्वारे शिक्षकांनी केलेल्या परिश्रमांना व सर्जनशील कार्याला योग्य सन्मान मिळणार असून, विद्यार्थ्यांना पुढे जाण्याची प्रेरणा मिळेल. कोकणातूनच ज्ञानाची नवी ज्योत प्रज्वलित करून, उद्योग व रोजगाराच्या संधी निर्माण करणे हा या संस्थेचा ध्यास आहे.

 

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles