सावंतवाडी: मत्स्यबंदर विकास मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आज देवगड तालुक्यातील सकल हिंदू समाज व मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष तसेच कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेलचे संपादक सीताराम गावडे यांच्या “गावडेंचा राजा विघ्नहर्त्या”चे सावंतवाडी बिरोडकर टेंब येथे त्यांच्या निवासस्थानी जाऊन दर्शन घेतले.
यावेळी सीताराम गावडे यांनी नवसाला पावणाऱ्या गावड्याच्या राजाला विशेष साकडे घालून कोकणातील जनतेच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना केली. दर्शनानंतर पालकमंत्री नितेश राणे यांनी गावडे यांच्याशी हितगुज करत उपस्थितांशी विधायक चर्चा केली.
सीताराम गावडे यांनी पालकमंत्र्यांचे स्वागत करून आभार मानले. पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होताना पालकमंत्र्यांसोबत माजी नगरसेवक उदय नाईक यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
‘गावडेंचा राजा’चे पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतले दर्शन!
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


