कुडाळ : कुडाळ एम.आय.डी.सी. मध्ये अनेक छोटे मोठे उद्योजक हे आर्थिक अडचणीमुळे आपल्या उद्योगाला म्हणावी तशी भरारी देवू शकत नाही. कोरोना काळात तर अनेक उद्योजकांची लाखो रूपयांची मशीनरी खराब झाली. त्याही प्रतिकुल परिस्थिती काही उद्योजक हळूहळू सावरत आहेत. या समस्येची कल्पना जेव्हा भारतीय लघु विकास बॅंकेला दिली गेली तेव्हा याबाबतीत अडचणीत असलेल्या आणि नव्याने उद्योग सुरु करणाऱ्या उद्योजकांना सिडबीच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य करण्याची भूमिका भारतीय लघु उद्योग विकास बॅकेनी घेतली. त्या अनुषंगाने या उद्योजकांना कशाप्रकारे कमी व्याजदराने कर्ज सुविधा उपलब्ध करुन देवून सहकार्य करता येईल? यासाठी कुडाळ विश्रामगृह येथे एम.आय.डी.सी. इंडस्ट्रीज असोसिएशनचे पदाधिकारी व भारतीय लघु विकास बॅकेचे उप महाव्यवस्थापक कुमार सेठी, अधिकारी महेंद्र भाले यांच्यात सविस्तर चर्चा झाली. या अनुषंगाने दोन्ही संस्थामध्ये लवकर याबाबत सामंजस्य करार करणार असल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर यांनी जाहीर केले.
यावेळी असोसिएशनचे कार्यवाह अॅड. नकुल पार्सेकर, उपाध्यक्ष डॉ. नितीन पावसकर, सहकार्यवाह, कुणाल वरसकर,ज्येष्ठ सल्लागार आनंद बांदिवडेकर, संजीव प्रभू, सदस्य राजन नाईक, प्रमोद भोगटे आदि उपस्थित होते.
सिडबी समवेत कुडाळ एम.आय.डी.सी. इंडस्ट्रीज असोसिएशन सामंजस्य करार करणार.! – मोहन होडावडेकर.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


