- सावंतवाडी : राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून सावंतवाडी विधानसभा क्षेत्रातील गणेश भक्तांची चतुर्थी गोड करण्यासाठी आनंदाच्या शिधा वाटप सुरू आहेत. आज सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव येथील कासारवाडी येथे नागरिकांना आनंदाच्या शिधा वाटप करण्यात आल्या. शिवसेनेचे कोलगाव शाखाप्रमुख गौरव आनंद कुडाळकर यांनी घरोघरी जात मंत्री दीपक केसरकर यांच्या वतीने आनंदाच्या शिधा वाटप केल्या.
यावेळी मंत्री दीपक केसरकर यांनी आपली गणेश चतुर्थी गोड केल्याबद्दल कासारवाडी येथील नागरिकांनी त्यांना विशेष धन्यवाद दिलेत.