Monday, November 10, 2025

Buy now

spot_img

शाहू सर्कलच्या ‘महाराजा रील’ स्पर्धेत पुन्हा साईश गावडेचा डंका! ; सलग दुसऱ्या वर्षी सावंतवाडीचा सुपुत्र ठरला अव्वल!

कोल्हापूर : कोल्हापूर येथील शाहू सर्कलच्या महाराजा रील स्पर्धेत डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज फिजिओथेरपी विभागाचा द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आणि सावंतवाडीचा सुपुत्र साईश गावडे याने पुन्हा एकदा आपली प्रतिभा सिद्ध करत सलग दुसऱ्या वर्षी अव्वल क्रमांक पटकावला.
गेल्या वर्षी याच स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून नावाजलेला साईशने यंदाही आपल्या यशाची परंपरा अखंडित ठेवत अव्वल ठरला आहे. त्याच्या या यशाची सर्वत्र जोरदार चर्चा होत असून सावंतवाडी भूमीच्या या तरुणाने जिल्ह्याचे नाव उंचावले आहे.
गुरुवारी रात्री शाहू सर्कलच्या महाराजाच्या चौकात झालेल्या भव्य कार्यक्रमात मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आणि हजारो भक्तगणांच्या साक्षीने साईशला मानाचे शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.
साईशच्या या सलग विजयाने सावंतवाडीच्या भूमीत अभिमानाचे वातावरण असून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles