सावंतवाडी : येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सालईवाडा यांनी गणेशोत्सवामध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये महिलांसाठी विविध खेळ, पाककला स्पर्धा, हळदी कुंकू, फुगडी आणि लहान मुलांसाठी चित्रकला व वेषभूषा स्पर्धा यांसारख्या कार्यक्रमांचा समावेश आहे.
मंडळाने आयोजित केलेल्या कार्यक्रमांपैकी काही विशेष कार्यक्रमात ११ सप्टेंबर रोजी महिलांसाठी पाककला स्पर्धा आणि “खेळ पैठणीचा” कार्यक्रम आयोजित केलाय. १३ सप्टेंबर रोजी राजा स्वार यांच्यातर्फे महाप्रसादाचा कार्यक्रम तसेच रात्री अनिकेत दुड्डीकर यांनी “स्वर गंधार” या कार्यक्रमातून मराठी, हिंदी आणि कोकणी गीतांचा कार्यक्रम होणार आहे.
दिनांक १४ सप्टेंबर रोजी सकाळी लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा व सायंकाळी वेषभूषा स्पर्धा आणि विविध खेळांचे आयोजन करण्यात आलेय. सोमवार, १५ सप्टेंबर रोजी सकाळी सत्यनारायण महापूजा आणि रात्री भजनाचा कार्यक्रम असून १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी महाआरती करून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीची भव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे.


