Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

कुलदीपचा विकेट्सचा ‘चौकार’, नंतर अभिषेकचा तडाखा!, टीम इंडियाने २७ चेंडूत सामना जिंकला! ; आशिया कप स्पर्धेच्या भारत – युएई सामन्यात ‘हे’ तीन विक्रम!

आशिया कप स्पर्धेची सुरुवात भारतीय संघाने विजयाने केली. भारताने युएईचा 9 गडी राखून पराभव केला. या सामन्यात नाणेफेक गमावल्याने युएईने प्रथम फलंदाजी केली. 13.1 षटकं खेळत युएईने 57 धावा केल्या आणि विजयासाठी 58 धावांचं आव्हान दिलं. युएईने दिलेलं 58 धावांचं आव्हान पूर्ण करण्यासाठी भारतीय संघाला फार काही वेळ लागला नाही. 4.3 षटकात एक विकेट गमवून ही धावसंख्या गाठली. या विजयासह या सामन्यात तीन विक्रम नोंदवले गेले. या विक्रमांची आता क्रीडा वर्तुळात चर्चा होत आहे.

आशिया कप स्पर्धेत सर्वाधिक चेंडू राखून भारतीय संघाने विजय मिळवला आहे. भारताने या सामन्यात 93 चेंडू शिल्लक ठेवले. यापूर्वी भारताचा 81 राखून विजय मिळवण्याचा विक्रम स्कॉटलँडविरुद्ध 2021 मध्ये होता. जागतिक पातळीवर अशी कामगिरी करणारा भारत हा दुसरा संघ आहे. यापूर्वी इंग्लंडने ओमान विरुद्ध 2024 मध्ये 101 चेंडू राखून विजय मिळवला होता. श्रीलंकेने 2014 मध्ये नेदरलँडविरुद्ध 90, झिम्बाब्वेने मोझाम्बूक्यू नैरोबीविरुद्द 90 चेंडू राखून विजय मिळवला होता.

टी20 सामना कमी चेंडूत संपण्याची ही चौथी वेळ आहे. यापूर्वी श्रीलंका नेदरलँड यांच्यात 2014 साली झालेला सामना 93 चेंडूत संपला होता. त्यानंतर ओमान इंग्लंड सामना 2024 मध्ये 99 चेंडूत संपलेला. नेदरलँड श्रीलंका सामना 2021 मध्ये 103 चेंडूत संपला होता. आता भारत युएई सामना 106 चेंडूत संपला आहे. (Photo - BCCI Twitter)

(Photo – BCCI Twitter)

टी – 20 सामना कमी चेंडूत संपण्याची ही चौथी वेळ आहे. यापूर्वी श्रीलंका नेदरलँड यांच्यात 2014 साली झालेला सामना 93 चेंडूत संपला होता. त्यानंतर ओमान इंग्लंड सामना 2024 मध्ये 99 चेंडूत संपलेला. नेदरलँड श्रीलंका सामना 2021 मध्ये 103 चेंडूत संपला होता. आता भारत युएई सामना 106 चेंडूत संपला आहे.

युएईविरुद्धच्या सामन्यात भारताच्या अभिषेक शर्माने पहिल्याच चेंडूवर षटकार मारला. अशी कामगिरी करणारा टी20 क्रिकेटमध्ये भारताचा चौथा फलंदाज आहे. रोहित शर्माने आदिल राशीद विरुद्ध 2021 मध्ये, यशस्वी जयस्वालने सिकंदर रझा विरुद्ध 2024 मध्ये, संजू सॅमसनने जोफ्रा आर्चरविरुद्ध 2025 मध्ये आणि अभिषेक शर्माने हैदर अली विरुद्ध अशी कामगिरी केली.

युएईविरुद्धच्या सामन्यात भारताच्या अभिषेक शर्माने पहिल्याच चेंडूवर षटकार मारला. अशी कामगिरी करणारा टी20 क्रिकेटमध्ये भारताचा चौथा फलंदाज आहे. रोहित शर्माने आदिल राशीद विरुद्ध 2021 मध्ये, यशस्वी जयस्वालने सिकंदर रझा विरुद्ध 2024 मध्ये, संजू सॅमसनने जोफ्रा आर्चरविरुद्ध 2025 मध्ये आणि अभिषेक शर्माने हैदर अली विरुद्ध अशी कामगिरी केली. (Photo - BCCI Twitter)

(Photo – BCCI Twitter)

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles