Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

पंतप्रधान मोदींना डोनाल्ड ट्रम्प यांचा फोन, ७५व्या वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा! ; भारत-अमेरिका व्यापार कराराबद्दलही चर्चा!

नवी दिल्ली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज (१७ सप्टेंबर २०२५) ७५वा वाढदिवस आहेया निमित्याने देशासह जगभरातून पंतप्रधान मोदींना शुभेच्छा देण्यात येत आहेअशातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील पंतप्रधान मोदींना वाढदिवसानिमित्त फोनवरून शुभेच्छा दिल्या आहेततर शुभेच्छा देण्यासाठी फोन केल्याबद्दल मोदींनी देखील समाज माध्यमांवरून ट्रम्प यांचे आभार मांडले आहेतया फोनवरील संभाषणामध्ये युक्रेन संघर्षाच्या शांततापूर्ण निराकरणासाठी अमेरिकेने घेतलेल्या पुढाकारांना पंतप्रधान मोदींकडून पाठिंबा ही देण्यात आल्याची माहिती आहे. तर तुमच्याप्रमाणेच, मी देखील भारत-अमेरिका व्यापक आणि जागतिक भागीदारीला नवीन उंचीवर नेण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे, अशी पंतप्रधान मोदींनी भूमिका घेतलीयतर यादरम्यान दोन्ही नेत्यांनी भारत-अमेरिका व्यापार करार आणि युक्रेन मुद्द्यावर देखील या निमित्याने चर्चा झाली आहे.

ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना त्यांच्या वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा –

पंतप्रधान मोदींनी इंस्टाग्रामवर पोस्ट करून ही माहिती दिली. पंतप्रधान मोदींनी त्यात लिहिले कि, “माझ्या मित्रा, राष्ट्रपती ट्रम्प, माझ्या 75व्या वाढदिवसानिमित्त तुमच्या फोन कॉलबद्दल आणि मनापासून शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद. तुमच्याप्रमाणेच, मी देखील भारत-अमेरिका व्यापक आणि जागतिक भागीदारीला नवीन उंचीवर नेण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे. युक्रेन संघर्षाच्या शांततापूर्ण तोडग्यासाठी तुमच्या पुढाकाराचे आम्ही समर्थन करतो.” असे मोदी या पोस्ट मध्ये म्हणालेत.

व्यापार करारावरील चर्चेनंतर पंतप्रधान मोदी-ट्रम्प यांच्यात चर्चा –

दोन्ही देशांमधील व्यापार करारावरील चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली असताना ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. मंगळवारी दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये बैठक झाली. ही बैठक सुमारे 7 तास चालली, जी दोन्ही देशांनी सकारात्मक असल्याचे वर्णन केले. अमेरिकन दूतावासाने म्हटले आहे की, द्विपक्षीय व्यापार चर्चेवरील ही बैठक सकारात्मक होती.

भारतीय वाणिज्य मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, दोन्ही बाजूंनी द्विपक्षीय व्यापाराचे महत्त्व मान्य केले आणि सकारात्मक आणि भविष्य-केंद्रित चर्चा केल्या. या बैठकीत, व्यापार करार (BTA) लवकरच पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांना गती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

एका आठवड्यात झाली दोनदा चर्चा –

एका आठवड्यात दोन्ही नेत्यांमधील ही दुसरी चर्चा होती. गेल्या आठवड्यापासून ट्रम्प यांचे मनोवृत्त मऊ होत असल्याचे दिसून येत आहे. ओव्हल ऑफिसमध्ये त्यांनी भारताला एक महान देश म्हणून वर्णन केले आणि ते नेहमीच पंतप्रधान मोदींचे मित्र राहतील, असे सांगितले. टॅरिफ वॉरनंतर दोन्ही देशांमधील वाढत्या तणावाबद्दल ट्रम्प म्हणाले होते, “काळजी करण्यासारखे काही नाही. कधीकधी आपल्याकडे असे क्षण येतात.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles