सावंतवाडी : डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने २०२५– २६ ची पहिली जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेचा शुभारंभ आज शनिवार दिनांक २० सप्टेंबर रोजी सावंतवाडी जिमखाना येथे करण्यात आला. या स्पर्धेला खेळाडूंचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. भाजपा महाराष्ट्रचे युवा नेते श्री. विशाल परब यांच्या संकल्पनेतून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त या भव्यदिव्य स्पर्धेचे आयोजन भाजपा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले आहे.
१८ वर्षांखालील मुले व मुली आणि खुला गट अशा वयोगटांमध्ये या स्पर्धा घेण्यात येत आहेत. या स्पर्धेचे ॲड. परिमल नाईक यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह, तसेच आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.

ही स्पर्धा अखिल भारतीय कॅरम महासंघाच्या प्रचलीत नियमावलीनुसार खेळविण्यात येत असून सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा होत आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त होत असलेल्या या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस श्री. महेश सारंग, सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडीवरेकर, जिल्हा कार्यकारणी सदस्य मनोज नाईक, माजी नगरसेवक ॲड. परिमल नाईक, आनंद नेवगी, जिल्हा कार्यकारणी सदस्य प्रसाद अरविंदेकर, सरचिटणीस दिलीप भालेकर, उपाध्यक्ष वैशाख मिशाळ, चिटणीस धीरेंद्र म्हापसेकर, शक्ती केंद्र प्रमुख साईनाथ जामदार, नागेश जगताप, गणेश पडते, नगरसेविका सौ. दीपाली भालेकर, शहर उपाध्यक्षा सुकन्या प्रविण टोपले, मिसबाह शेख, अन्वीशा मेस्त्री, श्रुती सावंत, मेघना साळगावकर, मेघा भोगटे, संजू शिरोडकर, जिल्हा सदस्य अजय गोंदावळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. अवधूत भणगे, ज्येष्ठ भाजपा पदाधिकारी ॲड. अनिल निरवडेकर, सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे सचिव श्री योगेश फणसाळकर, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचे मार्गदर्शन या स्पर्धेला लाभले. या स्पर्धेसाठी अठरा वर्षे वयोगटात 24 स्पर्धक व खुल्या गटात ५६ स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थिती दर्शविलेल्या राज्य विजेती केसर निर्गुण हिचा यावेळी आयोजकांमार्फत सत्कार करण्यात आला. एकूण दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेला रसिक क्रीडा प्रेक्षक व खेळाडूंचा उदंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे.


