Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

विद्यापीठ, शाळांमध्ये ‘सर’ ऐवजी ‘आचार्य’ म्हणण्याची परंपरा सुरू करावी! ; पीठाधीश्वर स्वामी जितेंद्रनाथ महाराजांचे मोठं वक्तव्य.

अमरावती : विद्यापीठ, शाळांमध्ये सर म्हणणं बंद करा, सर म्हणण्या ऐवजी आचार्य म्हणण्याची परंपरा सुरू करावी. असे मत श्रीनाथपीठ देवनाथ मठाचे पीठाधीश्वर स्वामी जितेंद्रनाथ महाराज यांनी केली आहे. मराठी विद्यापीठांमध्ये जे प्राध्यापक किंवा प्रोफेसर राहतील त्यांना सर न म्हणता आचार्य म्हणण्याची परंपरा रूढ करावी. शाळांमध्ये सर म्हणणं बंद करा. सर म्हणजे मान्यवर, मात्र शिक्षक म्हणजे माय, शिक्षक म्हणजे बाप, शिक्षक हा गुरु आहे. समर्थ शिक्षक म्हणजे भगवान गोपाल कृष्ण आणि घडणारा, गीता कंठस्थ करणारा, ऐकणारा तो अर्जुन आहे. असं हे नातं सर शब्दात कधी बसतं का? सर आणि आचार्य याची तुलना केली तर आचार्य श्रेष्ठ आहे, असेही ते यावेळी म्हणाले. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार परंपरा ज्यांनी गुंडाळल्या त्या ब्रिटिशांचं सर हे नाव आहे. किमान मराठी विद्यापीठामध्ये तरी जे प्राध्यापक किंवा प्रोफेसर राहतील त्यांना सर ऐवजी आचार्य म्हणण्याची परंपरा सुरू करावी, असा माझा आग्रह आहे. असेही स्वामी जितेंद्रनाथ महाराज म्हणाले.

सर आणि आचार्य याची तुलना करताना आचार्य श्रेष्ठ – जितेंद्रनाथ महाराज

समाजहितासाठी झटणाऱ्या, सेवा-निष्ठा आणि त्यागाने आपली छाप उमटवणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यासाठी कार्यगौरव सोहळा अमरावतीच्या शिव परिवारकडून आयोजित करण्यात आला. यावेळी श्रीनाथपीठ देवनाथ मठाचे पीठाधीश्वर स्वामी जितेंद्रनाथ महाराज यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. या सोहळ्यात कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते, प्रभारी कुलगुरू डॉ महेंद्र ढोरे आणि मराठी विद्यापीठ कुलगुरू डॉ. अविनाश आवलगावकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी स्वामी जितेंद्रनाथ महाराज यांनी अतिशय मोठं वक्तव्य केले. ते म्हणाले की, मराठी विद्यापीठांमध्ये जे प्राध्यापक किंवा प्रोफेसर राहतील त्यांना सर न म्हणता आचार्य म्हणण्याची परंपरा रूढ करावी. शाळांमध्ये सर म्हणणं बंद करा. सर म्हणजे मान्यवर मात्र शिक्षक म्हणजे माय, शिक्षक म्हणजे बाप शिक्षक हा गुरु आहे. समर्थ शिक्षक म्हणजे भगवान गोपाल कृष्ण आणि घडणारा, गीता कंठस्थ करणारा, ऐकणारा तो अर्जुन आहे. असं हे नातं सर शब्दात कधी बसतं ?.. सर आणि आचार्य याची तुलना करताना आचार्य श्रेष्ठ आहे. असेही असेही स्वामी जितेंद्रनाथ महाराज म्हणाले.

…तर तो छत्रपतींचा अपमान ठरतो- स्वामी जितेंद्रनाथ महाराज

ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार परंपरा ज्यांनी गुंडाळल्या त्या ब्रिटिशांचं सर हे बिरुद जर इथला शिक्षक आपल्या शिरावर मिरवत असेल तर तो छत्रपतींचा अपमान ठरतो. किमान मराठी विद्यापीठामध्ये तरी जे प्राध्यापक किंवा प्रोफेसर राहतील त्यांना सर म्हणण्या ऐवजी आचार्य म्हणण्याची परंपरा सुरू करावी असा माझा आग्रह आहे असे जितेंद्रनाथ महाराज म्हणाले.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles